शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेला; आमच्यावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:23 IST

रीना राजपूरकर यांनी मांडली व्यथा; गोकुळाष्टळी असूनही केवळ दोनच मटक्यांची विक्री

आगरदांडा : आज गोकुळाष्टमीचा दिवस असूनही सकाळपासून ग्राहक नाही, परंतु दुपारच्या दरम्यान एक-दोन मटकी विकली गेली, तर माझे सहकारी म्हसळकर यांचे एकही मटके विकले गेले नाही. या व्यवसायात मेहनत जास्त आणि कमाई कमी असते. एक मटकी बनविण्यासाठी साधारण २० रुपये खर्च होतो. मटकी तयार झाल्यावर आम्ही ही मटकी बाजारात आणून २५ रुपयांना विक्री करत असतो, परंतु ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, अशी व्यथा मटकी विके्रते रीना रूपेश राजपुरकर यांनी ‘लोकमत’जवळ मांडली.गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी घेतल्याने त्याचा फटका मटकी विक्रे ते व कुंभारांना बसला आहे. गोकुळाष्टमीचा दिवस उजडला, तरी दहीहंडीसाठी मटकी घ्यायला मुरुड बाजारपेठेत ग्राहकांच नसल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. मुरुडमधील कुंभार वाड्यात दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनविली जातात. आज त्यांच्याकडे शेकडो मडकी तयार आहेत. मात्र, कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाला बंदी असल्याने उत्सवकर्त्यांनी मटकी घेण्यासाठी पाठ फिरविल्याने मटकी विके्रत्यांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे राज्यसरकाराने आमच्या समाजाकडे लक्ष देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी मुरुड कुंभारवाड्यातील रिना रूपेश राजपूरकर यांनी केली आहे.गोकुळाष्टमी हा उत्सव मोठ्या थाटा सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही, तर तो दुसऱ्या दिवशी सोडतात. दुसºया दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दहीहंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरात ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.बाजारपेठेतील हजारो रुपयांची उलाढाल ठप्पश्रीकृष्ण जन्म उत्सवाच्या दिवशी बाजारपेठेत हजारो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, या कोरोनामुळे सर्वांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. करोनाचे संकट असल्याने यंदा फक्त श्रीकृष्ण जन्मकाळ फक्त पाच जणांच्या उपस्थित साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे.दुसºया दिवशी होणारा गोपाळकाला साजरा न करण्याची संयमी भूमिका घेऊन करोनाला आळा घालू या, असे आवाहन दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष अच्युत पोतदार यांनी केले आहे. यंदा हिरमोड झाला, तरी पुढच्या वर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करू, असेही अच्युत पोतदार म्हटले आहे.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी