शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील सर्व दस्तावेज सील

By admin | Updated: January 6, 2017 05:57 IST

रोहा अष्टमी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक विवादावर गुरुवारी जिल्हा न्यायालय माणगाव येथे सुनावणी होती. या वेळी या निवडणुकीत वापरण्यात आलेले सर्व दस्तावेज

रोहा : रोहा अष्टमी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक विवादावर गुरुवारी जिल्हा न्यायालय माणगाव येथे सुनावणी होती. या वेळी या निवडणुकीत वापरण्यात आलेले सर्व दस्तावेज, वोटिंग मशिन्स, कागदपत्रे, पुस्तके इत्यादी सर्व सीलबंद करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. ही माहिती रोहा अष्टमी शहरात समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. काहीतरी मोठा घोळ या निवडणुकीत झाल्याचे जिल्हा न्यायाधिशांना प्रथमदर्शनी दिसून आल्यानेच हे आदेश पारीत करण्यात आले असावेत, अशी चर्चा गुरुवारी दिवसभर रोहा अष्टमी शहरात होती. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या नोव्हेंबर २०१६मध्ये संपन्न झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या अनेक गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे यांनी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात निवडणूक पिटिशन दाखल केलेले आहे. त्यावर डिसेंबर २०१६मध्ये दोन वेळा सुनावणीही झालेली आहे. या विवादावर गुरुवारी सुनावणी होती, न्यायालयाने सरकारी वकील आणि सामनेवाला यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकू न निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहा यांनी वरीलप्रमाणे सर्व दस्तावेज सीलबंद करण्याचे व सीलबंद केलेल्या दस्तावेजांचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी केले आहेत.