शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:27 IST

गणेशमूर्ती प्रतिष्ठान संघटनेची वज्रमूठ : राष्ट्रीय हरित लवादाकडे​ दावा दाखल

दत्ता म्हात्रेपेण :  प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे​ दावा दाखल करण्यात यावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने गणेशमूर्ती संघटनेला दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याची जोरदार तयारी राज्यव्यापी मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोहे-पेण येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत केली आहे. 

या बैठकीत केंद्रीय पातळीवर पर्यावरण विषयाशी संबंधित राष्ट्रीय हरित लवादाकडे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या पीओपीचा वापर करण्यावर नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार घातलेल्या जाचक अटींमुळे या मूर्ती निर्माण करण्यावर पुढील वर्षापासून कायमचीच बंदी येऊ नये, अशा मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याबाबत आतापर्यंत औरंगाबाद न्यायालयाचा २०११ व गुजरात राज्यातील न्यायालयाचा २०१८चा निकाल पुरावा, त्यामधील प्रयोगशाळा तज्ज्ञांचे रिपोर्ट व शास्त्रज्ञांची मते व त्यांचे पीओपीबाबतीतले राबविलेले उपक्रम, पुणे महापालिकेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यांनी मूर्ती विघटनावर राबविलेले उपक्रम अहवाल, तसेच डॉ. जयंत गाडगीळ बायोमेट्रिक प्रयोगशाळा पुणे विद्यापीठ यांनी केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर यावरील शोध प्रबंध या शास्त्रीय विज्ञान निष्ठतेचे पुरावे सादर केले जाणार आहेत.

मुळातच पीओपीचा वापर घरांचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण, पक्ष्यांचे खाद्य, वैद्यकीय उपयोगासाठी, रस्ते बांधणी यासाठी केला जातो आहे. त्यामुळे पीओपीचा वापर करण्याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक निर्णय घेऊन ही समस्या कायमची निकाली काढतील, असा आशावादही राज्य गणेशमूर्ती प्रतिष्ठान संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर यांनी व्यक्त केला.

याबाबत संघटनेचा प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी, खासदार, आमदार, स्थानिक​ स्वराज्य संस्थांचे महापौर, नगराध्यक्ष यांच्यासह आयुक्त, जिल्हाधिकारी​ यांनाही या समस्येचा निपटारा करण्यासाठी व लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह व रोजगाराची हमी राहावी अशा व्यापक लढाईसाठी राजाश्रय व कायदेविषयक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ या सर्व मंडळींचे सहकार्य घेऊन केंद्रीय​ राष्ट्रीय हरित लवादाकडे प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी कायमस्वरूपी उठविण्यात यावी यासाठी पदाधिकारी एकवटले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड