शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे मूर्तिकार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:45 IST

गणेशोत्सवास दोन आठवडे; बोर्ली पंचतन परिसरातील गणपती कारखान्यांत मूर्तिकारांची लगबग

- अभय पाटीलबोर्ली पंचतन : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्याची मोठी लगबग सुरू असून, खंडित होणारा वीजपुरवठा मोठी डोकेदुखी ठरत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने, वीजपुरवठा अखंडित राहावा, अशी मागणी गणेश मूर्तिकारांनी केली आहे.गणेशोत्सव हा कोकणातील जिव्हाळ्याचा व भक्तीचा सण. सध्या गणपती मूर्तिकारांची मूर्तीवर रंगकाम करण्याची मोठी लगबग सुरू आहे. बोर्ली पंचतन, दांडगुरी, आसूफ, दिवेआगर, वेळास, शिस्ते, वडवली, दिघी गावांसह इतरही छोट्या गावांमध्ये शेकडो मूर्तिकार मूर्तिकाम करण्यात दंग आहेत.चक्रीवादळामुळे महिनाभर वीजपुरवठा खंडित होता. महिन्याच्या कालावधीनंतर या भागातील वीजपुरवठा सुरू झाला खरा, परंतु वीजपुरवठा अद्यापही सतत खंडित होण्याचे प्रमाण मोठे आहे. गणपती कारखानदार यामुळे जास्त त्रस्त झाले आहेत. जनरेटर भाड्याने घेऊन मूर्तिकाम करावे लागते. त्यासाठी लागणारे रॉकेल शिधापत्रिकेमध्ये मर्यादित मिळत असल्याने ते पुरेसे होत नाही, तर पेट्रोल वापरावे, तर तेही नेहमीच्या दरवाढीमुळे मूर्तिकारांसाठी मोठे संकट उभे राहिले.चक्रीवादळामुळे घराचे पत्रे, छप्पर नादुरुस्त झाल्याने, तयार मूर्ती भिजल्याने त्यांचे नुकसानही मोठे झाले आहे. मूर्तिकारांना घराच्या नुकसानीची भरपाई मिळाली, परंतु लॉकडाऊनमुळे कामगार न मिळण्याचा प्रश्न, आवश्यक साहित्य वेळेत न मिळाल्याने मूर्तिकामात उशीर होणे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. दोन आठवड्यांवर गणेश चतुर्थी आली असल्याने, दिवस-रात्र जागून मूर्तिकाम करावे लागत आहे. मूर्तीच्या अखेरच्या कामात मोठे अडथळे येत आहेत. गणेश मूर्तिकारांनाही विशेष मदत जाहीर करण्याची मागणी मूर्तिकारांतून होत आहे.आम्ही छोट्या गावातील गणेश मूर्तिकार नहमीच दुर्लक्षित राहिलो आहोत, कोरोनाचे संकट,निसर्ग चक्रीवादळ, महिनाभर नसणारा वीजपुरवठा व आता सततचा खंडित वीजपुरवठा, यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहोत. शासनाने लक्ष पुरवावे, अन्यथा आम्हा मूर्तिकारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.-सूर्यकांत गोवीलकर, गणेश मूर्तिकार बोर्ली पंचतन

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव