शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

‘चलाख’ दरोडेखोर जेरबंद

By admin | Updated: May 10, 2016 02:06 IST

दरोडा टाकताना महिलांच्या अंगावरील मंगळसूत्रे न खेचणे, त्यांना कोणताही धक्का न लावणे, अशी काही ‘पथ्ये’ पाळून घरांमध्ये घुसून गोळीबार करून जबरी चोऱ्या करणाऱ्या देवाशीष तारापद

ठाणे : दरोडा टाकताना महिलांच्या अंगावरील मंगळसूत्रे न खेचणे, त्यांना कोणताही धक्का न लावणे, अशी काही ‘पथ्ये’ पाळून घरांमध्ये घुसून गोळीबार करून जबरी चोऱ्या करणाऱ्या देवाशीष तारापद बंक ऊर्फ आशीष संदीप गुनगुन ऊर्फआशीष दिवाकर गांगुली (३९, रा. टिटवाळा) आणि शंकर ऊर्फ रमेश कांचन दास या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अमेरिकन आणि इटली बनावटीच्या दोन रिव्हॉल्व्हर, दोन गावठी कट्टे आणि दोन बनावट पिस्तूल अशी सहा रिव्हॉल्व्हर, पोलिसांच्या बेड्या, तीन बंजर, तीन कोयते, एक कुऱ्हाड या शस्त्रांसह एक मोटारसायकल, हॅण्डग्लोज आणि चेहऱ्याचा मास्क अशी दरोड्याची सामग्रीही जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी दिली. त्याला १३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अभय कुरुं दकर यांच्या पथकाने त्याला ८ मे रोजी टिटवाळ्यातून अटक केली. २००७ पासूनच घरफोड्या करणाऱ्या देवाशीषवर ठाणे ग्रामीणच्या टिटवाळा, मुरबाड, कुळगाव, वांगणी, मीरा रोड परिसरात चोरीचे सहा, रायगड जिल्ह्णातील नेरळ, कर्जतमधील तीन, पालघर जिल्ह्णातील सफाळ्यात एक तर गुजरातमधील डुंगरी, बलसाड, नवसारी या तीन अशा १३ जबरी चोरीच्या गुन्ह्णांची नोंद आहे.मूळच्या पश्चिम बंगालमधील देवाशीषकडे वेगवेगळी तीन पॅनकार्ड मिळाली. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.