शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्री दुर्घटनेतील मृतांचे दाखले घरपोच

By admin | Updated: August 21, 2016 01:39 IST

महाड सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांचे मृत्यू दाखले प्रशासनाकडून घरपोच पोहोचवले जात आहेत. दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांपैकी सापडलेल्या मृतदेहांचे दाखले महाडमधील विविध

दासगाव : महाड सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांचे मृत्यू दाखले प्रशासनाकडून घरपोच पोहोचवले जात आहेत. दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांपैकी सापडलेल्या मृतदेहांचे दाखले महाडमधील विविध ग्रामपंचायतींमध्ये तयार करण्यात आले.महाड सावित्री दुर्घटनेत दोन एस.टी.बस आणि एक तवेरा कारमधील ४१ प्रवासी बेपत्ता झाले होते. बेपत्ता प्रवाशांपैकी २८ प्रवाशांचे मृतदेह महाडजवळ विविध गावांत सापडले आहेत. दुर्घटनेतील दोन बस आणि तवेरा सापडल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली. मात्र अद्याप १२ प्रवासी बेपत्ता आहेत. सापडलेल्या मृतदेहांच्या नातेवाईकांसमोर मृत्यू दाखल्यांचा प्रश्न उभा राहिला होता. महाड महसूल विभागाने संबंधीत ग्रामपंचायतींकडून तत्काळ मृत्यू दाखले तयार करून घेतले आहेत. हे दाखले एकत्रितपणे मृत व्यक्तींच्या गावातच महसूल विभागाकडून दिले जाणार आहेत. महसुल विभागाने हे मृत्यूदाखले संबधीत तहसिल कार्यालयांकडे पाठवले आहेत.महाड महसुल विभागाने एकूण २७ दाखले वितरीत केले. यापैकी महाड महसूल विभागाने १५ दाखले तयार केले. महाडमधील केंबुर्ली, दादली, सव, राजेवाडी, वराठी, नडगाव, तेलंगे मोहल्ला, महाड नगर पालिका, या ग्रामपंचायतींकडून दाखले तयार करण्यात आले आहेत. मृत्यू दाखल्यांप्रमाणेच महसूल विभागाकडून नैसर्गीक आपत्ती काळात देण्यात येणारी मदतही तत्काळ दिली. (प्रतिनिधी)महाड पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींकडून तयार केलेल्या मृत्यू दाखल्यांच्या तारखांत तफावत झाल्याचे दिसून येत आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेले आसिफ अहमद चौगुले, आवेश अल्ताफ चौगुले हे दोघे एकाच घरातील असून त्यांचे मृतदेह दादली आणि आंबेत येथे सापडले. मात्र, दोघांच्या मृत्यू दाखल्यांवर वेगवेगळ्या तारखा टाकण्यात आल्या आहेत. याला त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. तहसीलदार संदीप कदम यांनी हे दाखले ग्रामपंचायतींकडून माहिती घेऊन बदलले जातील, असे सांगितले.