शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन नगराध्यक्ष निवडणुकीत सातनाक विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:39 IST

शिवसेनेचे अनंत गुरव पराभूत : राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जितेंद्र सातनाक विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे अनंत गुरव यांना पराभूत केले. जनतेमधून निवडून आलेले नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे गैरहजेरीच्या कारणास्तव अपात्र ठरल्याने नगराध्यक्ष निवडणूक घेण्यात आले. नरेंद्र भुसाणे यांच्या गैरहजेरी कालावधीमध्ये प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जितेंद्र सातनाक यांनी काम केलेले आहे. निवडणूक अधिकारी सचिन गोसावी यांनी शुक्रवारी दुपारी मतमोजणीनुसार जितेंद्र सातनाक यांना १२ व अनंत गुरव यांना ५ असे मते मिळून जितेंद्र सातनाक विजयी झाले, असेघोषित केले.

यावेळेस होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी जितेंद्र सातनाक व फैसल हूरजुक दोन्हीही राष्ट्रवादीचे नगरसेवक इच्छुक होते. त्या कारणास्तव पक्षांतर्गत मोठ्या स्वरूपात रस्सीखेच झाली आहे. खासदार सुनील तटकरे व विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी सुवर्णमध्य काढत जितेंद्र सातनाक यांना सहा महिने व फैसल हूरजुक यांना नऊ महिने नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरवले. त्यानुसार, मार्च, २०२१ पर्यंत जितेंद्र सातनाक नगराध्यक्षपदी कार्यरत राहतील. त्यानंतर, फैसल हूरजुक यांना नगराध्यक्षपदी संधी देण्यात येईल.

बहुमताने निवडच्नगराध्यक्षपदाचे दुसरे इच्छुक उमेदवार फैसल हूरजुक हे मुस्लीम समाजातील उदयमुख नेतृत्व आहे. खा.सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या नगरसेवकांनी जितेंद्र सातनाक यांना बहुमताने निवडून दिले.