शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेसाठी सॅटेलाइटची मदत

By admin | Updated: July 21, 2015 04:51 IST

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना करताना प्रथमच सॅटेलाइटची मदत घेतली जाणार आहे

आविष्कार देसाई, अलिबागआगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना करताना प्रथमच सॅटेलाइटची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे अचूक सीमांकन करण्यास जिल्हा प्रशासनाला मदत मिळणार आहे. प्रभाग रचनेत सातत्याने होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाला त्यामुळे आळा बसेल. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, राज्य आणि केंद्रातील सत्तेमध्ये आपल्याच पक्षाचे प्राबल्य राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ््या मार्गाने प्रयत्नशील असतात. निवडणुकीत कपडे, साड्या, महागड्या वस्तू आणि अमाप पैसाही वाटला जातो. त्याचप्रमाणे ओल्या-सुक्या पार्ट्याही आयोजित करून मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करीत असतात. याच्याही पुढचा विचार करणारी राजकीय मंडळी राजकारणात आहेत. एखाद्या वॉर्ड अथवा प्रभागामध्ये विशिष्ट पक्षाचे प्राबल्य असणारे मतदार असतील, तर त्या मतदारांची नावे लगतच्या वॉर्ड अथवा प्रभागामध्ये फिरवली जातात. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली जातात. अर्थात ही प्रक्रिया केवळ प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय अशक्य आहे. यावर सर्व राजकीय डावपेचांना कुचकामी ठरविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करताना सॅटेलाइटची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर २०११ च्या अध्यादेशान्वये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे काम लवकरच सुरु करावे, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने ७ जुलै २०१५ रोजी धाडले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.