शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाला तरुणांनी दिली पसंती, २१० पैकी ८५ ग्रामपंचायतींत ३५ पेक्षा कमी वयाचे उमेदवार

By निखिल म्हात्रे | Updated: October 27, 2023 18:37 IST

ज्येष्ठांचे टेन्शन वाढले, तरुण विरुद्ध ज्येष्ठ अशी लढत पाहायला मिळणार

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. जिल्ह्यात २१० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडा सुरू आहे. यावेळी दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असून, निवडणूक रिंगणात तरुणाई उतरलेली दिसत आहे. २१० ग्रामपंचातींपैकी ८५ ग्रामपंचायतींत सरपंचपदाचे उमेदवार हे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. यामुळे ज्येष्ठांचे टेन्शन वाढले असून, तरुण विरुद्ध ज्येष्ठ अशी लढत पाहायला मिळणार आहे.

तरुणांचा गावातील दांडगा संपर्क आता त्यांची जमेची बाजू होत असून, मतदारही तरुणाईवर आता विश्वास दाखवत असून, ग्रामपंचायतींचा कारभार हाती देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण वर्ग उतरला आहे. ही संख्या पाहता, निवडणुकीचा निकाल यावेळी काही वेगळीच चित्र निर्माण करणार यात शंका वाटत नाही. सरपंच थेट जनतेतून निवडून जाणार असल्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.

सरपंचपदासाठी ४८५ जण रिंगणात

२१० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर होती. अर्ज मागे घेतल्यानंतर २१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ४८५, तर सदस्यपदासाठी ३३९५ उमेदवार रिंगणात आहेत. यात सरपंचपदासाठी २५ ते ३५ वयोगटातील ८५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष ?

- ५ नोव्हेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतून गावपातळीवरून नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची समीकरणे तयार होत असल्याने आपलाच सरपंच राहावा, या उद्देशाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांमार्फत ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी नेते मंडळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यावर लक्ष ठेवून आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी महाडच्या ५२ ग्रामपंचायती आम्ही जिंकणार असा दावा केला आहे.

निवडणूक बनली हायटेक -

पंचायत राज व्यवस्थेमुळे ग्रामपंचायत आता स्वावलंबी बनली आहे. त्यात १५ व्या वित्त आयोगामुळे सरपंच पदाचे महत्त्व वाढले असून, यंदाही जनतेतून सरपंच निवडायचा आहे. गावकारभार हाती घेण्यासाठी इच्छुकांची फौजच दिसून येत आहे. काहीही होऊ दे; पण खुर्ची आपल्यालाच हवी, यासाठी गावागावांत प्रचाराचा धुरळा उडत आहे. विशेष म्हणजे, मोठ्या निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतची निवडणूक हायटेक झाली असून, होडिंग-पोस्टरचे नव्हे, तर सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर केला जात असतानाच दिसत आहे.

गावच्या सर्वांगिण विकासासाठी राजकारणात आम्ही तरुण पुढे येत आहोत. सध्या तरुणाईसोबत शिक्षणाची जोड आहे. त्यामुळे महीलांचे सवळीकरण, वृध्दांचे विविध प्रश्न,  आपंगांसाठी कल्याणकारी योजना गावात राबवून गाव सधन कसा ठेवता येईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत. तसेच निवडून आल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने गावचा विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे.- हर्षदा म्हात्रे-मयेकर, (सरपंच पदाचा उमेदवार)...गेले अनेक वर्ष गावात रस्ता विज आणि पाणी प्रश्न एैरणीवर होता. एक महीला म्हणून या तिन प्रश्नांने मी स्वता हैराण झाले होते. अनेकवेळा या मुलभुत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही ग्रामपंच्यातीमध्ये खेटा घातल्या होत्या मात्र सोयी सुविधांची पुर्तता न झाल्याने गावातील आम्ही तरूण एकत्र येऊन हि ग्रामपंच्यात निवडणूक लढवित आहोत.- आजिता गावंड-गजने, (सरपंच पदाचा उमेदवार)

टॅग्स :alibaugअलिबाग