शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संजय भोईर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: May 29, 2016 03:04 IST

पेण तालुक्यातील जांभूळटेप येथील पेण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती संजय धाया भोईर यांचे गांधे - चोळे आणि शिहू - आटीवली नळ पाणीपुरवठा योजनेच्या

नागोठणे : पेण तालुक्यातील जांभूळटेप येथील पेण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती संजय धाया भोईर यांचे गांधे - चोळे आणि शिहू - आटीवली नळ पाणीपुरवठा योजनेच्या भ्रष्टाचारात नाव पुढे आल्याने संभाव्य अटक टाळण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी होऊन १८ मे च्या आदेशान्वये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी नागोठणे पोलिसांचा रिपोर्ट तसेच कागदपत्रांचे अवलोकन करून भोईर यांचा अर्ज फेटाळला आहे. विभागातील शिहू ग्रामपंचायत हद्दीतील गांधे - चोळे आणि शिहू - आटीवली या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आठ लाखाचा निधी मंजूर झाला होता. हे काम काराव, गडब येथील काळंबादेवी मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. हे काम झालेले नसतानाही प्रत्यक्षात काम पूर्ण झाले असल्याबाबतचा निधी संबंधित संस्थेला अदा करण्यात आला होता. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तीन अधिकारी तसेच अनंत कुथे आणि घनश्याम कुथे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (वार्ताहर) चौकशीत संजय भोईर यांचा या प्रकरणात हात असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे भोईर यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र अतिरिक्त जिल्हा न्यायमूर्ती पेठकर यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आहे.