शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणाला दुरु स्तीअभावी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:03 IST

भिंतींवर वाढली झुडपे; संबंधितांचे दुर्लक्ष

म्हसळा : तालुक्यातील १९८०च्या दशकातील संदेरी धरण दुरुस्तीअभावी शुक्रवारी अखेरची घटका मोजत आहे. धरणाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने गाळसिंचन करण्याचे काम हाती न घेतल्याने आज धरणाच्या काही भागांत गळती लागली आहे.

यंदाच्या पावसात सरासरी धरणाचा ७० टक्के भाग पाण्याने भरला असून, हे धरण दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या मुख्य पायथ्याशी मजबुतीकरिता असलेल्या भिंतींवरही अनेक झुडपांनी तग धरला आहे. भविष्यात या भिंतींना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. ५०० ते १००० घरांची वस्ती असलेल्या संदेरी गावची वस्ती धरणाच्या एक किमी अंतरावर असल्याने जर का धरण फुटले, तर ही गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धरणाजवळ असलेल्या कामगारांसाठी असलेल्या घरांचीही नासधूस होऊन ही जागा पडिक झाल्याने येथे कोणताही कर्मचारी सद्यस्थितीत फिरकताना दिसत नाही. त्यामुळे धरणाजवळील क्षेत्राला पडक्या वाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खाडीपट्टा विभागातील आंबेत, संदेरी, फळसप या तीन ग्रामपंचायतींच्या गावांना या धरणाचा पाणीपुरवठा होत असून, अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतींकडून दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला नाही.

आंबेत खाडीपट्टा विभागातील असलेले संदेरी धरण हे आज अखेरची घटका मोजत असताना, या विभागातील आंबेत, संदेरी व फळसप या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकाराने या धरणाचे दुरुस्तीच्या, तसेच इतर समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या बाबींकडे लक्ष घालून हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे, परंतु ग्रामपंचायतीकडून पाहिजे ते सहकार्य मिळत नाही आणि याचा फटका नागरिकांवर बसत आहे.- मुकेश आंबेकर, नागरिक

टॅग्स :Raigadरायगड