शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

भूखंडाची विक्री, सीईटीपी प्लॅण्ट केला भुईसपाट

By admin | Updated: November 23, 2015 01:05 IST

तारापूर एमआयडीसीमधील ओ २३/१ या प्लॉटवर जागतिक बँकेच्या साहाय्याने उभारलेल्या देशातील पहिल्या व ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या दोन एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक

पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसीमधील ओ २३/१ या प्लॉटवर जागतिक बँकेच्या साहाय्याने उभारलेल्या देशातील पहिल्या व ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या दोन एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्लँट विक्रीला टीमा-सीईटीपी को-आॅप. सोसायटीने विरोध करूनही त्याला न जुमानता या प्लॉटमधील २० हजार स्क्वेअर मीटरपैकी १७ हजार स्क्वेअर मीटर प्लॉट दोन उद्योगांना एमआयडीसीने विकले असून त्या उद्योगांनी सीईटीपीचा प्रकल्पही जमीनदोस्त केला आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता २६ आॅगस्ट १९९२ ला अ‍ॅमेनिटी भूखंड क्र. ५० (भूखंड क्र. ओ-२३ (१) पार्ट) च्या मधील २० हजार चौरस मीटर जागा एमआयडीसीकडून घेऊन त्या भूखंडावर औद्योगिक क्षेत्रातील २४८ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजने टीमा-सीईटीपी को-आॅपरेटिव्ह सोसायटी बनवून सुमारे एक कोटी आठ लाख खर्चून १७ आॅगस्ट १९९४ ला प्रथम एक एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्र सुरू केले. त्याकरिता, जागतिक बँकेकडून ६० लाखांचे कर्जही घेतले होते, तर १९९९ साली त्या प्रकल्पाची आणखी एक एमएलडीने क्षमता वाढवून ती दोन एमएलडी करण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पाची एकूण सुमारे पाच कोटी प्रोजेक्ट कॉस्ट झाली होती. त्यामध्ये सरकारकडून सबसिडी सुमारे ७० लाख रुपये मिळाली होती.२५ एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर २००८ नंतर तारापूर एमआयडीसी पालघर, डहाणू व तलासरी आदी भागांतील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील सॉलीड वेस्ट एकत्र करून तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पाठविण्यात येत होते. तर, २५ एमएलडी सीईटीपी म्हणजेच पर्यावरणरक्षणासंदर्भातच करण्यात येत होता. तारापूर एमआयडीसीमधील कंपनीकरिता उपयुक्त असे इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर सुरू करण्याच्या विचारात टीमा-सीईटीपी सोसायटी होती.अशा पर्यावरणासंदर्भातच अ‍ॅक्टिव्हिटी ०-२३/१ या प्लॉटवर सुरू असतानाच अचानक ११ व १४ फेब्रुवारी २०१४ या दोन दिवशी एमआयडीसीने टीमा-सीईटीपी को-आॅप सोसायटीला पत्र पाठवून प्लॉट क्र. अ‍ॅमेनिटी भूखंड क्र. ५० (भूखंड क्र. ओ-२३(१) पार्ट क्षेत्र २०००० चौ.मी. व अ‍ॅमेनिटी भूखंड क्र. ४९ (भूखंड क्र.ओ-२३ (१) पार्ट) क्षेत्र ५००० चौमी भूखंड आता म.औ. विकास महामंडळास आवश्यक असल्यामुळे हे भूखंड परत करून दोन्ही भूखंडांच्या मूळ ताबा पावत्या प्राथमिक करारनाम्याच्या मूळ प्रती तसेच अंतिम करारनामा प्रत इत्यादी दस्तऐवज एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात परत करावे, असे त्या पत्रात नमूद केले होते. या पत्राला टीमा सीईटीपी को-आॅप. सोसायटीने एमआयडीसीला प्रथम उत्तर दिले. त्यानंतर, तीन स्मरणपत्रेही पाठविली. परंतु, एकाही पत्राचे उत्तर हे दोन्ही प्लॉट टीमा सीईटीपी को-आॅप. सोसायटीने पालघर जिल्हा न्यायालयाकडून प्लॉटवरील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे स्थगिती आदेश मिळवून ते एमआयडीसीकडे सुपूर्दही केले. मात्र, पूर्वीच त्या प्लॉटवरील सीईटीपीचा २ एमएलडीचा प्रकल्प जमीनदोस्त करण्यात आला आहे.