शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

साळाव-रेवदंडा खाडीपुलाचा कठडा तुटला

By admin | Updated: August 18, 2015 02:59 IST

रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे

बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली असून येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या तिन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. साळाव - रेवदंडा पुलाचे काम १९८६ साली करण्यात आले होते. त्यामुळे अलिबाग, रोहा आणि मुरु ड हे तीन तालुके जवळ आले. या पुलामुळे मुरु ड तालुक्यात आर्थिक, सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. या पुलाच्या निर्मितीनंतर मुरु ड तालुक्याला पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी साळाव - चणेरा - रोहा -नागोठणे - मार्गे वडखळ पेण मार्गे खोपोली पुणे किंवा पेण - पनवेल -मुंबई असा प्रवास करावा लागत असे. हा प्रवास त्याकाळी ७ ते ९ तासांचा होत असे. काही वर्षांपासून अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने या पुलाची वाताहत झाली आहे . या पुलाला मे २०१४ मध्ये दुसऱ्यांदा भेग पडली होती. त्यावेळी बांधकाम खात्याने लोखंडी पट्टी लावून त्या ठिकाणी सिमेंट लावले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र आता पट्टी लावलेला सिमेंटचा भाग निखळला आहे, पुलाच्या कठड्याचा काही भाग पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)