शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘सहकारमहर्षी’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:32 IST

सहकार क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार; बदलत्या काळात बदलती धोरणे ठेवल्याने मिळाले यश

अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मुंबई वांद्रे रिक्लमेशन येथील रंगशारदा सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेचे संचालक नृपाल पाटील, आस्वाद पाटील, प्रशांत नाईक, अ‍ॅड.परेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर राष्ट्रीय तसेच देशपातळीवरील अनेक पुरस्कार पटकाविले असून राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सहकाराच्या विकासाचा रायगड पॅटर्नचे अवलोकन राज्यातील सर्वच जिल्हा बँकांनी करावे, असेही या वेळी नमूद केले. ‘सहकारमहर्षी’ हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असून राज्यातील एकूण दोन लाख ३८ हजार संस्थांमधून ‘सहकारमहर्षी’ या पुरस्काराकरिता निवड केली जाते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वच सहकारी संस्थांमधून प्रथम क्रमांक मिळवल्याचे सांगितले.बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पुरस्काराला उत्तर देताना कोकणामध्ये सहकार रु जत नाही असा समज असताना राज्यातील सर्वोच्च ‘सहकारमहर्षी’ हा बहुमान रायगड जिल्हा मध्य.सहकारी बँकेच्या रूपाने कोकणाला प्राप्त होत आहे त्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आणि बँकेच्या शेतकरी आणि सामान्य ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बँकेला हा पुरस्कार मिळाला असून त्यांच्यासमवेत काम करणारे बँकेचे सर्व संचालक आणि बँकेचे कर्मचारी यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले. या वेळी व्यासपीठावर आमदार अ‍ॅड.आशिष शेलार,राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर आदी उपस्थित होते.५ वर्षांमध्ये ५० कोटींपर्यंत ढोबळ नफारायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या दशकातील कामगिरी ही थक्क करणारी असून बँकेने आजवर आपल्या सांपत्तिक स्थितीमध्ये सातत्याने आॅडिट वर्ग अ संपादन करीत मागील ५ वर्षांमध्ये ५० कोटींपर्यंत ढोबळ नफा मिळविला आहे. बँकेचा आजचा व्यवसाय हा ३२०० कोटींच्या पुढे असून रिझर्व्ह बँक, नाबार्ड तसेच शासन पातळीवरील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.सहकार क्षेत्राला अधिक मजबूत बनविण्यासाठी बँकेचे योगदान फार महत्त्वाचे ठरले आहे. बँकेचे संगणकीकरण ज्यामध्ये स्वत:चे डेटा सेंटर तसेच जिल्ह्यातील इतर सहकारी बँकांना याचा फायदा व्हावा याकरिता डेटा सेंटर शेरिंगसारखी सुविधा, आय.एस.ओ.९००१-२०१५ प्रमाणपत्र या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा ग्राहकांना उपयोगिता सिद्ध करून दाखवू शकतात आणि बदलत्या काळात बदलती धोरणे समोर ठेवून बँकेने हे सिद्ध केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडbankबँक