शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

माथेरानमध्ये मिनीबसची सुरक्षा कठड्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:27 IST

माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असले तरी परिसरातील डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे स्थानिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

- मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असले तरी परिसरातील डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे स्थानिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सरकारकडून याठिकाणी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, स्थानिकांना रोजीरोजी, वाहतुकीसाठी अद्याप पुरेशी साधने नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबतची विघ्ने अद्याप संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.रविवारी सकाळी सहा वाजता माथेरानहून कर्जतकडे रवाना होणाºया मिनीबसलाअपघात झाला. बस अवघड वळणावरील सुरक्षा कठड्यावर आदळली. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी चालकांना वाहन चालवताना नेहमीच कसरत करावी लागते. कठड्यावर आदळल्याने बस थोडक्यात वाचली, अन्यथा दरीत कोसळली असती. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.हरित लवादाच्या अटी-शर्थींमुळे वनखात्याकडून रस्ता दुरु स्तीसाठी परवानगी दिली जात नाही. त्यामुळे परिसरात वाहनांची वर्दळ वाढली तरी रस्ते मात्र अरुंदच आहेत. शिवाय रस्त्यांची डागडुजी होत नसल्याचे दुरवस्था झाली आहे. एकीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला नवीन बोगद्यासाठी वनखात्याची परवानगी दिली जाते. इको झोनमध्ये मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो डेपोच्या विकासासाठी अडथळा ठरणारी झाडे छाटून त्याजागी वनखात्याने परवानगी राज्य शासनाकडून मिळवलेली आहे. मग माथेरानसारख्या पर्यटन स्थळाकरिता दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.स्थानिकांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर कर्जत- माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, परंतु काहीना काही कारणास्तव या सेवेत नेहमीच विघ्ने येत आहेत. माथेरानच्या घाटरस्त्यावर अरुंद रस्ते व अवघड वळणांमुळे चालकांना गाडीवर ताबा नियंत्रण मिळवताना अनेकदा अडचणी येतात. कर्जत- माथेरान मार्गावर नव्याने दोन बसेस देण्यात आल्या आहेत, परंतु एकच गाडी नियमितपणे सेवा देत असून दुसरी गाडी कर्जत ते पनवेल अशी चालविली जात आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान