शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खारभूमी बंधाऱ्यांच्या कामासाठी धावाधाव; मनुष्यबळाअभावी यंत्राद्वारे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:16 IST

मान्सूनपूर्व तयारी; खारभूमी विभागातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर

दत्ता म्हात्रे

पेण : गतवर्षी महापुरात खारभूमी संरक्षक बंधारे फुटून पेण तालुक्यातील कणे, अंतोरे, मोठेवढाव, वाशी ओढांगी या वाशी विभागातील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. या विभागाबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल-विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल ९००० एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत.

गतवर्षी महापुरात फुटलेले समुद्र खाड्यांच्या संरक्षक बंधाºयांची देखभाल दुरुस्ती स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक स्वरूपात केली होती. मात्र, यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण विभागासमोर मोठे शिवधनुष्य उचलण्याची कठीण समस्या उभी राहिलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संरक्षक बंधाºयांची कामे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून मजबुती करणाची कामे करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पेणच्या खाडीकिनारच्या गावांना खारभूमी संरक्षक बंधारे फुटून समुद्राचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित अतिवृष्टीच्या वेळी जमते, त्या वेळी महापूर येतो. या महापुराच्या पाण्याचा प्रचंड ओघ गावांमध्ये शिरून त्या, त्या गावाला पुराचा वेढा पडतो. गतवर्षी पेणमधील करणे गावाला पुराचा वेढा पडून पुरात अडकलेल्या ७५ नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन करून प्राण वाचविले होते. कणे खारभूमी योजनेतील पूर्व बाजूकडील बंधारे जागोजागी फुटून भोगावती नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गाव व परिसरातील वाड्यांमध्ये पडला होता. येत्या मान्सून हंगामात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येणार, असा हवामान खात्याने व इतर मान्सूनच्या अंदाज वर्तविणाºया वेधशाळांनी सांगितले आहे. खारभूमी बंधाºयांचे बळकटीकरणाची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू व्हायला हवी होती. मात्र, योजनांचे आराखडे बनविण्यासाठी व या योजनावर विकास निधीची तरतूद, आॅनलाइन टेंडर प्रक्रियेसाठी वेळ लागतो. मार्च महिन्यांपासून कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता मे महिना उजाडला असून, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे.मजूर काम करण्यास तयार नाहीतगेले ४६ दिवस संपूर्ण देश लाकडाउनमध्ये बंद आहे. मजूर कष्टकरी, कोरोना महामारीच्या भीतीपोटी कामांवर येण्यासाठी राजी होत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे उरकण्यासाठी मनुष्यबळाअभावी यांत्रिक पद्धतीने मातीच्या भरावाने कामे उरकून समुद्रकिनारचे शेती संरक्षक बंधारे सक्षम, बळकट करण्यासाठी खारभूमी विभागातील अधिकाºयांनी कंबर कसली आहे.या वर्षीच्या मान्सून हंगामापूर्वी ही संरक्षक तटबंदीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन या सर्व बाबींचा विचार करून खारभूमी संरक्षक बंधाºयांच्या मजबुतीकरण कामे करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, शेतकरी खारभूमी विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता यांच्याकडे कामे उरकून घेण्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत.