शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणात ग्रामीण महिलांचा सहभाग

By admin | Updated: March 8, 2016 02:02 IST

पोलादपूर तालुक्यातील कुडपण, परसुले, गोळेगणी, पैठण, कोतवाल, ओंबी उमरठ, बोरज, वाकण, देवळे ,कापडे , गोवेळे या अकरा गावांमध्ये सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग आणि वसुंधरा पाणलोट

अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील कुडपण, परसुले, गोळेगणी, पैठण, कोतवाल, ओंबी उमरठ, बोरज, वाकण, देवळे ,कापडे , गोवेळे या अकरा गावांमध्ये सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग आणि वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तीन महिन्यांचा उपजीविका कौशल्य विकास कार्यक्रम गावस्तरावर राबविण्यात आला. या अंतर्गत उपजीविका कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तीन दिवसांचे प्रशिक्षण विविध गावातील स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी गट, वैयक्तिक लाभार्थी यांना त्यांनी निवडलेल्या कृषक व अकृषक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम साध्य होत आहेत. यामध्ये ग्रामीण महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती सुरभी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी दिली आहे.ग्रामीण उपजीविका आधारित उद्योग निर्मिती, उद्योग उभारण्यासाठी संधी, शाश्वन उद्योग उभारणी, बचत गट आणि उपभोक्ता गट यांना उपजीविका संधीच्या नवीन वाटा, बाजारपेठ, पॅकिंग तसेच बचत गट, शेतकरी गट, वैयक्तिक लाभार्थी यांच्या सहलीमध्ये प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. विविध प्रकारची लोणची , दुग्ध व्यवसाय, जर्सीगाई व गिरजातीच्या गार्इंचे व्यवस्थापन,चारा व दूध डेअरी, स्ट्रॉबेरी लागवड, भाजीपाला लागवड, शेळीपालन, देशी कुक्कुटपालन, नर्सरीमध्ये फुलझाडे, मसाल्यांची झाडे,औषधी वनस्पती लागवड, अगरबत्ती निर्मिती, पॅकिंग व लेबलिंग आदिविषयक प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले.जनकल्याण ट्रस्ट महाडमध्ये शेतीसंदर्भात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन महाड-पोलादपूर तालुक्यामध्ये आगळा आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. या कार्यक्रमाकरिता तेजाली निकम, सुषमा गोलांबडे आदिंचे सहकार्य लाभले आहे. (विशेष प्रतिनिधी)