शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धाटावमध्ये बँकेत २५ लाखांची चोरी

By admin | Updated: March 29, 2016 03:20 IST

तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्र धाटाव शाखेत २५ लाख रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे कुठलीही तोडफोड न करता चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम लाटली आहे.

रोहा : तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्र धाटाव शाखेत २५ लाख रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे कुठलीही तोडफोड न करता चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम लाटली आहे. सलग चार दिवस सुटी असल्याने बँक बंद होती. या दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती रोह्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीतील सामाईक सुविधा केंद्र येथे बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. बुधवारी २३ मार्चला बँकेचे कामकाज सायंकाळी नियमित वेळेत बंद झाले. २४ ते २७ मार्च दरम्यान सलग चार दिवस बँकेला सुटी होती. या दरम्यान चोरट्यांनी शक्कल लढवून कुठलीही तोडफोड न करता मुख्य दरवाजाचा आणि तिजोरीचा टाळा उघडून २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम लांबविली. पुन्हा दोन्ही ठिकाणांची कुलुपे लावून चोरट्यांनी पोबारा केला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडली जात असताना बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले. शाखा व्यवस्थापक एस. ए. अहमद सैफुद्दीन यांनी रोहा पोलिसांना या चोरीची माहिती दिली. रोहा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय धुमाळ तपास करीत आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा तपासात दिवसभर व्यस्त होती. चोरीस गेलेल्या रकमेचा नक्की आकडा स्पष्ट होत नसला तरी अंदाजे २५ लाखांहून अधिक रक्कम चोरीला गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली, त्याबरोबर दार व तिजोरीची कुलुपे व्यवस्थित बंद करण्यात आली असल्याने चोरटे हे नेहमीचे माहीतगार असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सलग चार दिवस सणासुदीच्या सुट्या असल्याने रोहा पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून बिट मार्शलमार्फत मंगळवारी २२ मार्चला तालुक्यातील सर्व बँकांना सतर्क राहण्याबाबतच्या लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये बँक अलार्म, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक आदीबाबत सतर्कता बाळगण्याच्या लेखी सूचनाही करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)