शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रोहा शहरात मोकाट गुरांचा उपद्रव

By admin | Updated: September 14, 2016 04:38 IST

तहसील कार्यालयासमोर तसेच रोहा शहरात सध्या मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे सा-यांनाच त्रास सहन करावा लागत आहे.

रोहा : तहसील कार्यालयासमोर तसेच रोहा शहरात सध्या मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे सा-यांनाच त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना रस्त्यावर गुरे उभी असल्यामुळे अडचण येत आहे. यामुळे यावर योग्य उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.रोहा शहरातील मुख्य हमरस्ता, तहसील कार्यालयासमोरी जागेत, दमखाडी त्रिमूर्ती नगर, न्यु कुंडलिका संकुल आदी ठिकाणी या मोकाट गुरांनी सध्या आपले बस्तान बसविले असल्याने सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य हमरस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक व शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात येणारे नागरिक यांना या मोकाट गुरांमुळे रस्त्यावरुन वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. तहसील कार्यालयासमोरील मार्ग हा अलिबाग व मुरूड तालुक्याना जोडला असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवासी वाहने, खाजगी यांची वर्दळ असते. तसेच प्रशासकीय कामासाठी तहसील कार्यालय, फॉरेस्ट कार्यालय व पोलीस स्टेशनला आपल्या दैनंदिन कामासाठी येणा-या नागरिकांची संख्याही मोठी असल्याने या सर्वांना या मोकाट गुरांचा मोठा त्रास होत आहे. त्रिमूर्ती नगरमधील न्यु कुंडलिका संकुलातील रहिवाशी या मोकाट गुरांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. मोकाट गुरांच्या संचाराने येथील नागरिकांना मोठा उपद्रव सहन करावा लागत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी न्यु कुंडलिका संकुलाचे अध्यक्ष संजय धोदरे यांनी केली आहे. (वार्ताहर)