शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

नेरळमध्ये रस्त्याची कामे केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:22 IST

नागरिकांची ग्रामपंचायतीकडे तक्रार : गैरसोयीबाबत व्यक्त के ली नाराजी

कांता हाबळे 

नेरळ : रायगड जिल्हा परिषद रस्त्याचे काम करीत असलेल्या नेरळ गावातील अनेक रस्त्यांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली आहेत. रस्त्याची कामे पूर्ण करताना ठेकेदाराने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने नागरिकांनी नेरळ ग्रामपंचायतीला लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत नेरळ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला कामे बंद करण्याचे पत्र दिले आहे.

नेरळ गावातील रस्त्यांच्या कामांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करीत होते. मात्र, त्या निधीमधून मंजूर असलेली आठ कामे करीत असताना ठेकेदाराकडून कामे होण्यासाठी स्थानिक नागरिकांना अनेक आश्वासने दिली गेली. ती कामे ठेकेदाराने रस्त्यावर काँक्रीटीकरण झाल्यानंतर पूर्ण केली नाहीत. आता त्या आठ कामांमधील शेवटचे काम नेरळ पाडा भागात रस्त्याचे सुरू आहे, ते काम काही दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, ते काम पूर्ण झाल्यावर संबंधित ठेकेदार कामे संपल्याने निघून जाणार याची खात्री पटल्याने नेरळमधील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार ठेकेदाराला नेरळ ग्रामपंचायतीने तक्रारी असलेल्या नागरिकांच्या अर्धवट कामाबद्दल जाब विचारला. त्या वेळी ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही. खांडा भागातील तब्बल २०० मीटर रस्त्याचे काम अर्धवट आहे, त्याच वेळी अन्य ८० नागरिकांना ठेकेदाराने शब्द दिला होता, ती कामे अर्धवट आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ पाडा भागात सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडले आहे. नेरळ ग्रामपंचायत ठेकेदारावर कामे अर्धवट ठेवल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे. त्याआधी नेरळ ग्रामपंचायतीने फलक लावून जिल्हा परिषदेने नेमलेल्या ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने आणि शेवटचे काम संपवून ठेकेदार निघून जाण्याच्या शक्यतेमुळे काम बंद केले असून, गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.मुरबाड रस्ता बंद राहणारच्नेरळ पाडा भागातून जाणारा रस्ता हा पुढे मुरबाड रस्त्याला जोडला जात असल्याने गेल्या ५ मार्चपासून रस्ता बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीने रस्त्याचे काम बंद ठेवल्याने आणखी काही दिवस मुरबाड रस्ता बंद राहणार आहे. त्याचा परिणाम नेरळ गावातील व्यापारावर होत असल्याने नाराजीदेखील व्यक्त होत आहे.रस्त्याची कामे जिल्हा परिषद करीत आहे, त्यात आमचा काही संबंध नाही; पण ठेकेदाराने नेरळमधील ग्रामस्थांना रस्ते करण्यासाठी अनेकांची घरे तोडली, अनेक बांधकामे तोडली, त्या वेळी संबंधित ठेकेदाराने आश्वासने दिली आहेत. त्यांच्याशी आमचा ग्रामपंचायतीचा संबंध नाही; पण नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पुढाकार घ्यावा लागला.- जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ ग्रामपंचायतनेरळ गावातील सर्व कामे ही नियमानुसार होतील. मात्र, ठेकेदाराने कोणाला शब्द दिला याबद्दल आमच्या खात्याचा काहीही संबंध नाही.- ए. ए. केदार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागआम्ही आता नेरळ ग्रामपंचायतीकडून सर्व नागरिकांच्या तक्रारी या नेरळ पोलिसांकडे देणार आहोत. पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्त्याने बाधित झालेल्या नागरिकांची कामे पूर्ण करून घ्यावीत.- अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड