शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर वाढलेल्या झुडपांचा अडथळा , दुचाकीचालकांना होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:44 IST

लोणेरेपासून पन्हळघरपर्यंतच्या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यावर सहवास फाट्यापासून पुढे काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाºया-जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

माणगाव : लोणेरेपासून पन्हळघरपर्यंतच्या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यावर सहवास फाट्यापासून पुढे काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाºया-जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाळ्यात जोमाने वाढलेल्या या झुडपांचा त्रास रस्त्यावरील वाहनांना व पादचाºयांना होत आहे. पन्हळघर, अंबर्ले, पन्हळघर बुद्रुक, आडी-वडाचा कोंड अशी गावे आणि काही वाड्या या रस्त्याशी संबंधित आहेत. येथून लोक लोणेरे व अन्य जवळपासच्या शहरात बाजारहाटीसाठी सतत आपल्या खासगी वाहनाने, रिक्षाने आणि बसने प्रवास करतात. शिवाय या परिसरातील विद्यार्थी लोणेरे येथील जे. बी. सावंत हायस्कूल, निकम इंग्लिश स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ व गोरेगावमधील ना. म. जोशी शाळा व कॉलेज येथे शिकत असल्याने त्यांची या रस्त्यावरून सातत्याने वर्दळ असते. काही लोक रोजगारानिमित्तानेही जवळच्या बाजारपेठेत येथून ये-जा करत असतात.तसेच या रस्त्यालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृह आहे. शेजारीच विद्यापीठातील कर्मचाºयांचे सरस्वती व गोमती असे भव्य निवासी संकुल आहेत. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती शासकीय रोपवाटिकेतसुद्धा अनेक वृक्षप्रेमी या रस्त्यावरून ये-जा करताना रस्त्यालगतच्या झुडपांचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरून अनेकदा मोठी वाहने बस, ट्रक, टेम्पो जात असतात, तेव्हा समोरून येणाºया छोट्या वाहनांना या रस्त्यावर वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. शिवाय बोर, करवंद, खैर यासारख्या झाडा-झुडपांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्याने वाहनांना बाजू देताना दुचाकीस्वारांना दुखापत होत असते.रस्त्यालगतच्या २५ ते ३० फूट रुंदीच्या व सुमारे ६० फूट खोलीच्या नाल्यात अनेकदा छोट्या वाहनांचे व दुचाकीस्वारांचे किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघातही येथे झाल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे. तरीही रस्ते विभागाच्या कर्मचाºयांनी रस्त्यावर आलेल्या झुडपांच्या फांद्या, साइडपट्टीवरील गवत व छोटी झुडपे शिवाय नदीकठड्यावर वाढलेल्या वेली व झुडपांची तोड करावी, अशी मागणी स्थानिकांसह प्रवासी करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड