शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळा शहरात रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: August 31, 2016 03:20 IST

हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायाचे लवकरच आगमन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

तळा : हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायाचे लवकरच आगमन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मंगलमूर्ती वाजतगाजत विराजमान होत असताना त्याला त्रास होवू नये अशी प्रत्येक नागरिकाची भावना असते. परंतु सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे सर्वत्र खड्डे पहावयास मिळत आहेत. हे खड्डे गणपतीपूर्वी बुजवावेत अशी नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांच्या पुढाकाराने काही ठिकाणचे खड्डे बुजविले. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे त्याचा उपयोग झाला नाही.तळा नगरपंचायतीची अवस्था बिकट आहे. त्यांना काम करण्याची इच्छा असून ही गेली दोन अडीच महिने मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्यामुळे अनेक ठिकाण खर्च करण्यास अडचण निर्माण होत आहे. आर्थिक व्यवहार त्यांचे सहीनेच चालतो. परंतु ते नसल्यामुळे अनेक कामांना अडचण निर्माण झालेली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी हा चार्ज तळा तहसीलदार भगवान सावंत यांच्याकडे दिला आहे. त्यांनी या कामासाठी त्वरित लक्ष घालून शहरातील रस्त्यावरील खड्डे त्वरित भरणे व दुरुस्ती गणपतीपूर्वी करावी अशी मागणी होत आहे.याबाबत तहसीलदार भगवान सावंत यांच्याशी संपर्क साधला असता गणपतीपूर्वी खड्डे भरले जातील असे सांगितले. पाऊस सतत पडत असल्यामुळे काम देखील करता येत नाहीत. त्याचबरोबर रस्त्यावरील पथदिवे देखील लागणे जरुरीचे आहे. अनेक रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यासाठी नगर पालिका व तहसीलदार भगवान सावंत यांनी लक्ष देवून हे काम गणपतीपूर्वी पूर्ण करावे, तसेच इंदापूर-तळा-मांदाड या राज्य महामार्गावर देखील खड्डे भरणे जरुरीचे आहे. इंदापूर-तळा मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गणपतीपूर्वी हे खड्डे सा. बां. विभाग माणगावने भरावेत अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)