शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमधील काँक्र ीटचा रस्ता दहा दिवसांत खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:18 IST

नेरळ गावात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधी एमएमआरडीएचा पण काम पाहत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून व्यवस्थित कामे

कर्जत : नेरळ गावात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधी एमएमआरडीएचा पण काम पाहत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून व्यवस्थित कामे करून घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. कारण नेरळ हुतात्मा भाई कोतवाल चौकापासून टॅक्सी स्टँड या भागातील काँक्रीटचा रस्ता तयार झाल्यानंतर दहा दिवसांत तो प्रवासासाठी खुला केला आहे. यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नेरळ गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. प्राधिकरण मुंबईमध्ये अन्य भागात कामाचा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. एमएमआरडीए कायम आपले नाव जपण्याचा प्रयत्न करीत असते, असे असताना नेरळ गावातील रस्त्यांची सुरू असलेली आरसीसी काँक्रीटची कामे प्राधिकरणाचे नाव धुळीस मिळविणारी ठरणार आहेत. नेरळ रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या हुतात्मा भाई कोतवाल चौकातून टॅक्सी स्टँड कार्यालयापर्यंत असलेल्या रस्त्याचे काँक्रीटकरण दिवाळीमध्ये केले. काँक्रीटकरण केल्यानंतर किमान २१ दिवस त्यावर पाणी साठवून ठेवले जाते. त्यासाठी आवश्यक डवरे केले जातात. मात्र केवळ दहा दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौक ते तलाठी कार्यालय या रस्त्यावर काँक्रीटकरण करण्यासाठी दीड महिन्याहून अधिक काळ रस्ता वाहतुकीस बंद होता. गणपती, दसरा या काळात रस्ता बंद असल्याने त्या भागातील असलेल्या व्यापाºयांनी आणखी किती दिवस नुकसान सहन करायचे? असा प्रश्न करून रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्याने व्यापाºयांना दमबाजी करीत २१ दिवस पाणी साठवून ठेवणार, या काळात रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. असे असताना नेरळ स्टेशन येथील रस्ता दहा दिवसांत खुला केला गेला आहे. यामुळे जि.प. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची दादागिरी कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.