शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महाड-पंढरपूर मार्गावर केबलसाठी रस्त्यालगत खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:06 IST

महाड-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वरंध घाटात अशाच खोदाईमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक संतप्त आहेत.

महाड : महाड-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वरंध घाटात अशाच खोदाईमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक संतप्त आहेत.डिजिटल इंडियाचा गवगवा करत गावागावात इंटरनेट पोहचवण्यासाठी अनेक गावातील रस्ते आणि महामार्ग, ग्रामीण रस्ते, राज्यमार्गाच्या बाजूपट्टीची बिनदिक्कतपणे खोदाई केली जात आहे. महाड- पंढरपूर मार्ग, महाड-रायगड मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, टोळ-आंबेत मार्ग अशा विविध मार्गावर खोदकाम झाले आहे. महाड-पंढरपूर मार्गावर ढालकाठी ते वरंध घाट या दरम्यान आता खोदकाम सुरू आहे.वरंध घाटात ऐन दिवाळीत या खड्ड्यांमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळाले, परंतु सुदैवाने मोठा अपघात व मनुष्यहानी टळली तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झालेले नाही. या अपघाताची पर्वा न करता आणि प्रशासनाला न जुमानता बिनदिक्कतपणे खोदकाम सुरूच आहे. या मार्गावर पुणे ते महाडपर्यंत कायम वर्दळ असते. छोट्या वाहनांबरोबरच एस.टी.च्या बसेस देखील कायम ये- जा करीत असतात. यामुळे साइडपट्टीलगत वाहने गेल्याने या केबलच्या चरात वाहन फसणे किंवा कलंडण्याचा धोका निर्माण झाला आहे.ऐन पावसाळ्यात महाड-रायगड मार्गावर रस्त्यालगत झालेल्या खोदकामात वाहने अडकणे, कलंडणे असे प्रकार घडले. तरी देखील कोणतीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही.असाच प्रकार या मार्गावरही सुरू आहे.रस्त्याचे नुकसान कंपन्यांकडून वसूलकोणत्याही कंपनीकडून खोदकाम करण्यापूर्वी रस्त्याचे जे नुकसान होते त्यासाठी बांधकाम विभाग या कंपन्यांकडून रक्कम भरून घेते.परंतु याचा अर्थ सर्वच ठिकाणी रस्त्याचे नुकसान करणे असा होत नाही.अडचणीचे असेल तेथेच असे खोदकाम करायचे आहे, परंतु या नियमाला बगल देत काम सुरू आहे.

टॅग्स :Raigadरायगड