शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग मेडिकल कॉलेजचा मार्ग झाला मोकळा; सरकारने दिली अटी, शर्तींवर परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:02 IST

जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत वापरता येणार; अडथळा दूर

आविष्कार देसाईरायगड : अलिबाग तालुक्यातील खानाव परिसरामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यातील अडथळा दूर झाला आहे. येथील सरकारी रुग्णालयाच्या इमारतींसह खाटांचा वापर आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वापरण्यास सरकारने मान्यता दिली आहे.सरकारने मान्यता देताना काही प्रमुख अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होण्याला आळा बसणार आहे. शिवाय जिल्हा सरकारी रुग्णालय प्रशासनाच्या अस्तित्वावर थेट गदा येणार नाही याची तजवीज सरकारने केली असल्याचे सरकारी आदेशात नमूद केल्याचे दिसून येते. तत्कालीन अर्थमंत्री तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी मेडिकल कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली होती. आता त्यांचीच मुलगी जिल्ह्याची पालकमंत्री होऊन ते स्वप्न पूर्णत्वास नेत असल्याचे अधोरेखित होते.

रायगड जिल्हा मुंबईला अगदी खेटून असणारा जिल्हा आहे. मात्र, जिल्ह्याची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. आरोग्य, शिक्षण अशा महत्त्वाच्या घटकांसाठी आजही जिल्ह्याला बहुतांश करून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांची वाणवा आहे. अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय असले तरी, सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना उत्तम दर्जाची  सेवा मिळत नाही.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयांतील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील अलिबाग येथे नियोजित नवीन मेडिकल कॉलेजसाठी वापर करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

पालकमंत्री अदिती तटकरे यांचा पुढाकाररायगड जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारल्यास आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असल्याने तत्कालीन अर्थमंत्री तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न केले होेते. कालांतराने ते मागे पडले होते. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेत त्याला बळ दिले आहे. आता पुन्हा मेडिकल कॉलेज जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टिपथात आले आहे.

डॉ. गिरीश ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून निुयक्ती अलिबाग नवीन सरकारी मेडिकल कॉलेजसाठी व संलग्नित रुग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची मोजणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. सरकारने मेडिकल कॉलेजसाठी डॉ. गिरीश ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्तीही केली आहे.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत त्याचप्रमाणे अन्य बाबी वापरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये मेडिकल कॉलेज उभे करण्यातील मार्ग सुकर झाला आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला अधिक गती देऊन रायगडवासीयांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल. - अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

अर्थमंत्री असताना अलिबागमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा प्रयत्न केला होता. आता ते कार्य माझ्या मुलीच्या हातून पूर्णत्वास जात आहे याचा आनंदच आहे. रायगडवासीयांसाठी ते लवकर उभारता यावे यासाठी दिल्लीत आवश्यक लागणाऱ्या परवानगीसाठी माझा प्राधान्यक्रम असेल. - खासदार सुनील तटकरे, रायगड

 

टॅग्स :Raigadरायगडhospitalहॉस्पिटल