शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा भात पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 02:22 IST

पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत.

पेण : जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस व आॅक्टोबर हिटचे कडक ऊन, त्यामध्ये दिवसा ऊन; सायंकाळी पाऊस, असा दररोजचा पावसाचा खेळ सुरू असतो. कधी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटानंतर येणारा हस्त नक्षत्राचा पाऊस जाईपर्यंत शेतकरी तयार झालेले पीक कापणीसाठी सुरुवात करणार नाहीत. हातातोंडाशी आलेले भातपीक सोसाट्याचे वारे व पडणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त होत आहे. यामुळे शेतकºयाची चिंता वाढली असून नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे.परिपक्व झालेले भातपीक पाण्यात पडल्यास त्यातील तांदूळ खराब होतो व कणसांना अंकुर फुटतो, यामुळे या लहरी पावसाची कायम धास्ती शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे. पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत. आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे पश्चिमेकडील भात लागवड क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांची जमवा जमव करीत भातशेती लागवड केली होती. मात्र, या भागातील भाताचे उत्पादन निम्याने घटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य लागते. यासाठी जे पदरात पडेल ते घ्यावे, अशी शेतकºयाची भावना आहे.जुलैपासून लागलेला पाऊस धुवाधार पडल्याने गतवर्षी पडलेल्या सरासरी पावसापेक्षा अडीचपट जास्त सरासरी पाऊस यावर्षी पेणमध्ये झाला. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत दोन वेळा पूर येऊन प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता आॅक्टोबर उजाडला तरीही पाऊस जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. कधी एकदाचा पाऊस परतीच्या मार्गावर जातोय, या प्रतीक्षेत शेतकरी असून पडणारा पाऊस परिपक्व तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने पुन्हा एकदा शिवारातील भातशेतीत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेतकºयाला नुकसान होईल, अशी चिंता वाटत आहे.

टॅग्स :Raigadरायगड