शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या

By admin | Updated: July 3, 2017 06:36 IST

रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर आहे. रहदारीला अडथळा ठरणारी ही मोकाट गुरे सध्या अपघाताला कारणीभूतच

लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर आहे. रहदारीला अडथळा ठरणारी ही मोकाट गुरे सध्या अपघाताला कारणीभूतच ठरत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या मोकाट गुरांबाबत संबंधितांकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मुंबई-गोवा या राज्य महामार्गाला कोलाड येथे जोडलेला रोहा-कोलाड रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. धाटाव परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक कारखान्यांत रोजीरोटीसाठी कामगार रोह्यातील ग्रामीण भागांतून कामानिमित्त येत असतात, तर शालेय विद्यार्थीसुद्धा सायकलवरून प्रवास करताना दिसतात. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबर अवजड वाहनांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सामावेश आहे. सतत वर्दळीच्या या रस्त्यावर मात्र दिवसरात्र जागोजागी मोकाट गुरांचा प्रचंड प्रमाणात वावर होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच विजेच्या खेळखंडोब्यामुळे रात्री रस्त्यात बसलेली गुरे नजरेस न आल्यामुळे अपघात घडून अनेक जण जखमी, तर काहींना कायमचे अपंगत्व आले असल्याच्या कित्येक घटना घडल्याचे प्रवासी सांगतात. गुरांच्या या कळपामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडीसुद्धा होते. त्यामुळे याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.म्हसळ्यातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रासलोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : शहरात सध्या मोकाट जनावरांचा वावर सुरू असल्याने रहदारीला अडथळा ठरणारी ही मोकाट गुुरे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या मोकाट गुरांबाबत संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे प्रवासी वर्गातून सांगितले जात आहे.म्हसळा शहर प्रामुख्याने सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालये त्याचप्रमाणे बाजारहाट करण्यासाठी प्रमुख केंद्र असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या ग्रामीण भागातील नागरिकांना येण्यासाठी एसटी किंवा रिक्षा हेच साधन आहे. मात्र, रस्त्यावर एकापाठोपाठ असा गुरांचा कळप असल्याने रहदारीस अडथळा होऊन वाहतूककोंडी होत आहे. एकीकडे म्हसळ्यातील अरुंद रस्ते त्यामध्ये दुतर्फा उभी असलेली वाहने आणि या मोकाट जनावरांचा वावर शहरवासीय त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसामध्ये विजेचा लपंडाव सुरू असतो, त्यामध्ये ही गुरे न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी या मोकाट जनावरांबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी म्हसळाकरांकडून होत आहे.