शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली

By निखिल म्हात्रे | Updated: December 3, 2023 17:56 IST

जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग  - वाढत्या औद्योगिकरणामुळे रायगड जिल्ह्यातील भात पिकाचे लागवड क्षेत्र घटत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भात पिकाची उत्पादकता वाढली आहे. अनियमित पावसामुळे यावर्षी भाताची उत्पादनात घट होईल असा अदांज व्यक्त केला जात होता. मात्र कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत भाताच्या उतादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे.

सरासरीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. पण पावसाचे प्रमाण अनियमित होते. जुन आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पावसाच्या या अनियमीत पणामुळे भात पिकावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण भात लागवड आणि कापणी प्रयोगावरून तसे झाल्याचे दिसून येत नाही.

रायगड जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टर येवढे भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यावर्षी यापैकी ८९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. वाढते औद्योगिकरण, मजुरांची कमतरता यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली. मात्र नैसर्गिक तसेच तांत्रिक संकट येऊनही जिल्ह्यातील भाताच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात भाताची उत्पादकता तपासण्यासाठी कृषी विभागाकडून १५ तालुक्यात ३०० पिककापणी प्रयोग घेण्यात आले. अद्याप काही पिक कापणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पण जे अहवाल प्राप्त झाले. त्यात भाताची उत्पादकता वाढल्याचे दिसून आले आहे. मळणी आणि झोडपणीनंतर भाताची उत्पादकता प्रती हेक्टरी ४० क्विंटल येवढी मिळाली आहे. गेल्या वर्षी ही प्रती हेक्टरी ३८ क्विंटल येवढी होती. म्हणजेच यंदा हेक्टरी जवळपास २ क्विंटल उत्पादकता वाढली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्षी भाताची उत्पादकता वाढल्याचे या पिक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षावरून सिध्द होत आहे.जिल्ह्यात ३६ लाख मेट्रीक टन भाताचे उत्पादन -

रायगड जिल्ह्यात यंदा ८९ हजार ६०० हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. पिक कापणी नुसार सरासरी हेक्टरी ४० क्विंटल येवढे उत्पादन मिळाले आहे. म्हणजेच यावर्षी जिल्ह्यात ३६ लाख मेट्रीक टन येवढे विक्रमी भाताचे उत्पादन झाले आहे. राज्यातील इतर भागात परतीच्या पावसाचा फटका बसला असला तरी यावर्षी कोकणात परतीच्या पावसाचा फारसा त्रास झालेला नाही. त्यामुळे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. शेतकरी समाधानी आहेत.कृषी विभागाने पिक कापणी प्रयोग घेतले होते. त्यात यावर्षी भाताची उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असल्याचे दिसून आले आहे. अजून काही तालुक्यांचे पिक कापणी प्रयोग अहवाल येणे बाकी आहे. पण यंदा भाताचे उत्पादन वाढेल असेल प्राप्त आकडेवारीवरून दिसते आहे. - उज्वला बाणखेले, कृषी अधिक्षक, रायगड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र