शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल वसुलीत लाखोंची वाढ

By admin | Updated: March 26, 2016 02:40 IST

महाड तालुक्यात ठिकठिकाणी विनापरवाना डबर, वाळू, खडी, ग्रीट, मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर २०१५ - २०१६ या वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत महाड महसूल विभागाने

दासगाव : महाड तालुक्यात ठिकठिकाणी विनापरवाना डबर, वाळू, खडी, ग्रीट, मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर २०१५ - २०१६ या वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत महाड महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईमध्ये २८ लाख ४९ हजार ४४८ रुपये दंड स्वरूपात वसूल केले आहे. मात्र २०१४ - १५ अखेरपर्यंतच्या झालेल्या दंडात्मक कारवाईमध्ये झालेल्या वसुलीमध्ये यंदा १० लाख रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.वाळू, डोंगर, दगडखाणी, गौनखनिज ही शासनाची संपत्ती आहे. मात्र त्याच्या उत्खननासाठी महसूल विभागाकडून रीतसर रॉयल्टी परवाना घेणे गरजेचे आहे. महाड तालुक्यात अनेक ठिकाणी उत्खननासाठी परवानगी कमी घेऊन नियमापेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात येते. मात्र २०१५ - १६ या वर्षामध्ये मार्च अखेरपर्यंत महाड तालुक्यात अनधिकृतपणे होणाऱ्या गौन खनिज उत्खनन व त्याची वाहतूक करणाऱ्यांवर महाड प्रांताधिकारी सुषमा सातपुते तसेच तहसीलदार संदीप कदम यांनी सर्व मंडळाधिकारी व सजेतील सर्व तलाठी यांच्यामार्फत धडक कारवाईची मोहीम हाती घेत एक वर्षात २०१६ मार्च अखेरपर्यंत अनधिकृत वाळू उत्खनन, डबर, ग्रीट,खडी मातीचे भराव तसेच इकोझोनमध्ये असलेल्या वीटभट्ट्यांवर अशा ९७ कारवाया करत महाड महसूल विभागाने शासनाच्या तिजोरीत २८ लाख ४९ हजार ४४८ रुपयांची भर पाडली आहे. गेल्या वर्षी २०१५ च्या मार्च अखेरपर्यंत एक वर्षाची दंडाची वसुली १८ लाख होती. परंतु या वर्षी १० लाखांनी वसुली वाढ झाल्याची माहिती महाड तहसीलदारांकडून देण्यात आली आहे. तसेच पुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.उत्खनन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महसूल विभागाकडून नियमाप्रमाणे उत्खननास परवानगी देण्यात येते. मात्र परवानगीधारक कमी पैशाची रॉयल्टी घेऊन अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवतात. गेल्या वर्षी ९७ धडक कारवाया करत महाड महसूल विभागाने २८ लाखांची दंडात्मक वसुली केली आहे. यापुढेही अशाच प्रकारे अनधिकृत उत्खनन व त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच कारवाईची यापुढे मोहीम सुरूच राहील, अशी माहिती महाडचे तहसीलदार संदीप कदम यांनी दिली.