शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा सामुदायिक सहकारी कृषी संस्थेची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:50 IST

रेवदंडा सामुदायिक सहकारी कृषी संस्थेने सभासदांना शेतीसाठी दिलेल्या भूखंडावर विविध बेकायदा व्यवसाय उभारले आहेत.

अलिबाग : रेवदंडा सामुदायिक सहकारी कृषी संस्थेने सभासदांना शेतीसाठी दिलेल्या भूखंडावर विविध बेकायदा व्यवसाय उभारले आहेत. याच जमिनीवर व्यापारी बांधकाम करून अटी-शर्तींचा भंग केला आहे. त्याचप्रमाणे निबंधकाच्या परवानगीशिवाय सुमारे ५० सभासदांचे सदस्यत्वही बेकायदेशीरपणे रद्द केले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत चौकशीचे आदेश दिले आहेत. या बाबतची सुनवाणी ११ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात होणार आहे. यावेळी अलिबागच्या प्रांत अधिकाºयांनाही सविस्तर अहवाल घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.रेवदंडा सामुदायिक सहकारी संस्था ही संस्था १३ जुलै १९६८ रोजी नोंदणीकृत झाली, त्या वेळी संस्थेचे १२६ सभासद होते. सरकारने या संस्थेस त्या वेळी ८० एकर जागा दिली होती. एवढ्या मोठ्या जागेची वाटणी करताना संस्थेने ७७ सदस्यांपैकी काही सदस्यांना २५ गुंठे, तर काही सदस्यांना १२४ गुंठे असे प्लॉटचे वाटप केल्याचे उपविभागीय अधिकारºयांकडील १२ मे २००३ च्या आदेशानुसार स्पष्ट झाले होते. १२६ पैकी उर्वरित ५० सदस्यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या संस्थेच्या भूमिकेवर या सभासदांच्या वारसांनी शंका उपस्थित केली होती. या १२६ सभासदांपैकी १२६ क्र मांकावरील सभासद केसरीनाथ चव्हाण यांना गेली ३४ वर्षे भूखंडच दिला नसल्याने काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी सुनावणी लावल्यामुळे खरे सत्य बाहेर येण्यास मदत मिळणार आहे.>पत्रव्यवहार केलात्या संस्थेच्या सरकार मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या बेकायदा उद्योगांबाबत चौकशी करण्यासाठी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी आयुक्त कोकण विभाग, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, प्रांत अधिकारी अलिबाग,तहसीलदार यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता.