शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सेझसाठी घेतलेल्या जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:07 IST

हाशिवरे येथील सभेत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची मागणी

रायगड : जिल्ह्यात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घेतलेल्या जमिनी सरकारने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. कामगार आणि कृषी कायद्याला विराेध करण्यासाठी आमदार पाटील हे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जाऊन कामगार आणि शेतकऱ्यांची माेट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील सभेत ते बाेलत हाेते.

शेकापने प्रदीर्घ लढे देऊन कूळ कायद्याचे हक्क मिळवले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणून त्यांना देशाेधडीला लावण्याचे काम माेदी सरकार करत आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. कामगार कायद्यामुळे कंपनीचे मालक हे आपल्या कामगारांना कामावरून थेट काढून टाकू शकतात. हा कामगारांवर अन्याय करणारा कायदा आहे. अतिशय गंभीर प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे. याचसाठी २६ नाेव्हेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी भारतबंदची हाक देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आणि कामगारविराेधी कायद्याविराेधात सर्वांनी पेटून उठणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे बाधित झालेेेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई तातडीने द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, मनोज धुमाळ, सिद्धनाथ पाटील यांंच्यासह खारेपाठ विभागातील कार्यकर्ते  उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करावा !

शेतकरी आणि कामगारांविरोधात केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करण्याच्या मागणीसह जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये साडेबावीस टक्के विकसित भूखंडासह सर्व लाभ मिळावेत, अशी मागणी केली. दहा वर्षांपूर्वी सरकारने  विशेष आर्थिक क्षेत्राच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून हजाराे हेक्टर जमिनी घेतल्या आहेत. त्या ठिकाणी काेणताच प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी तातडीने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी