शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:21 IST

मुरुडमधील बोट मालक-चालकांच्या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवसाला हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. अशा वेळी ४०० पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना मान्य नसल्याने बोट मालक-चालक यांनी ३ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. यामुळे पर्यटकांना किल्ला न बघता परतावे लागत होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटवून किल्ला सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. विशेषतः शनिवार-रविवार पर्यटकांची मोठी संख्या असते. मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी बोट मालक-चालकांच्या आंदोलनाच्या पाठिंब्याकरिता राजपुरी किल्ला जेटीवर जाऊन आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहाणी करून किल्ल्यावरील निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी किल्ल्यावरील निर्बंध हटवून किल्ला सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जंजिरा पर्यटक सहकारी जल वाहतूक सोसायटीचे व्यवस्थापक नाझ कादरी यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुरुड तहसीलदार गमन गावित यांचे यावेळी आभार मानले. 

राजपुरी जेटी येथे येऊन बोट मालक-चालकांना किल्ला सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे. जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी सुरू करा. त्याबरोबर कोविड १९च्या नियमांची अंमलबजावणी करावी. सोशल डिस्टन्सचा वापर व मास्कचा वापर करावा. त्यानुसार रविवारपासून किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे.- गमन गावित, तहसीलदार, मुरुड

टॅग्स :RaigadरायगडFortगड