शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड तालुक्यातील वीजपुरवठा लवकर सुरळीत करा; शिष्टमंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:03 IST

तहसीलदारांकडे मांडली कैफियत

मुरुड : तालुक्यात आज १३ दिवसांपासून वीज गायब आहे. हा वीजपुरवठा कधी सुरळीत होणार याची कोणतीच शाश्वती नाही. वीज मंडळाकडून वीज येणार, असे फक्त सांगितले जात आहे. तालुका दंडाधिकारी व तहसीलदारांना अधिकार असतानासुद्धा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन केले जात नाही, मग जनतेने न्याय कोणाकडे मागावा अशी कैफियत मुरुड तहसीलदारांकडे मांडण्यात आली. तालुक्यात लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित जैन ढग्या शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तहसीलदारांची भेट घेण्यात आली. या वेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी माजी तहसीलदार नयन कर्णिक, विहूरचे माजी सरपंच मुश्रत उलडे आदींसह अनेक मान्यवरांनी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तहसीलदार गमन गावीत हे एका कार्यक्रमाला गेल्यामुळे शिष्टमंडळाने महसूल नायब तहसीलदार गोविंद कौतुम्बे यांची भेट घेतली.यावेळी जैन यांनी लोकांच्या भावना काय आहेत हे सांगितले, तसेच मुरुड वीजमंडळ ७०० पेक्षा जास्त खांब पडल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ७५ खांब बसवून झाले आहेत. पडलेले खांब जास्त असताना मनुष्यबळ कमी असल्याने हे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. तालुका दंडाधिकारी यांना विशेष अधिकार असून, लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी उप कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासोबत सभा आयोजित करावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी के ली. यावेळी नायब तहसीलदार गोविंद कौतुम्बे यांनी आपल्या समस्यांचे लवकरात लवकर निरसन होण्यासाठी तहसीलदारांना सांगून लवकरच सभा आयोजित करण्यात येईल, असे अश्वासित केले.

टॅग्स :electricityवीज