शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामदैवत श्री बापूजी महाराज मंदिराचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:03 IST

नांदवीमध्ये तीन दिवस धार्मिक कार्यक्रम : पंचकोशीतील हजारो भाविकांची हजेरी

अलिबाग : माणगाव तालुक्यातील नांदवी गावचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, नवीन मंदिराचे उद्घाटन व मूर्तींची प्रतिष्ठापना कार्यक्र म मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या वेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरावर कलशारोहण करण्यात आले.

धार्मिक विधींबरोबरच भजन, कीर्तन, होमहवन असे विविध धार्मिक कार्यक्र म तीन दिवस आयोजित केले होते. पहिल्या दिवशी मंदिरापासून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत फटाक्यांच्या आतशबाजीत निघालेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. रात्री सुश्राव्य कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी दिवसभर अग्नीस्थापना, वास्तुप्रासाद हवन, लोकपाल प्रतिलोकपाल हवन, मूर्तीचे दशविध स्नान, दीपवास, धूपवास, पुण्यवास व धान्यवास असे धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमासाठी मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी द्वारपूजन, घंटापूजन व मुख्यहवन झाल्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर कलशारोहण झाले. नांदवी गांवचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही बापूजी महाराजांचे दर्शन घेतले.

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थाननांदवीचे ग्रामदैवत असलेले श्री बापूजी महाराज म्हणजे पंचक्रोशी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवस्थानची यात्रा भरते. परिसरातील हजारो भाविक यात्रेला हजेरी लावतात. मुंबईकर चाकरमानी आवर्जून उत्सवाला हजर असतात. यात्रेच्या निमित्ताने गावागावांतील देवदेवतांच्या पालख्या, काठ्या बापूजी महाराजांच्या भेटीसाठी येतात. बापूजी महाराजांच्या जुन्या मंदिराची दुरवस्था झाली होती, त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला.

टॅग्स :alibaugअलिबाग