शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स गॅस पाइप लाइनला विरोध

By admin | Updated: September 29, 2015 01:20 IST

तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइप लाइन जात आहे

कर्जत : तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइप लाइन जात आहे, तशा प्रकारच्या नोटिसा भूसंपादन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना आल्या आहेत. मात्र काही झाले तरी आम्ही आमच्या शेतजमिनीतून पाइप लाइन टाकू देणार नाही असा ठाम निर्धार कर्जतमधील शेतकऱ्यांनी बैठकीत केला आहे.भारत सरकारने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने इथेन वाहतूक करण्यासाठी दहेज ते नागोठणेपर्यंत रिलायन्स गॅस पाइप लाइन्स लिमिटेड कंपनीला पाइप लाइन टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. ही पाइप लाइन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून जात आहे. कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीखालून पाइप लाइन घालण्यासाठी जमिनीच्या वापराबाबतचे हक्क संपादन करण्याच्या नोटीस सूर्या प्रकल्प डहाणू तथा सक्षम प्राधिकारी रिलायन्स गॅस पाइप लाइन्स लिमिटेडचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसला शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात हरकती घेतल्या आहेत, मात्र या संबंधीची सुनावणी ३० सप्टेंबर रोजी बोलावण्यात आली आहे.ही रिलायन्स गॅस पाइप लाइन आम्ही आमच्या शेतजमिनीमधून टाकू देणार नाही यासाठी बाधित शेतकऱ्यांची बैठक दहिवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी झाली. या बैठकीस आमदार सुरेश लाड, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई विलास थोरवे, माजी सरपंच बाळू थोरवे, निमंत्रक अविनाश कडू, विलास देशमुख आदी उपस्थित होते.(वार्ताहर)