शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

कर्जत तालुक्यात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू

By admin | Updated: September 17, 2016 02:16 IST

कर्जतमधील १८९ विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र माला १६ सप्टेंबरपासून सुरु वात झाली.

कर्जत : कर्जतमधील १८९ विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र माला १६ सप्टेंबरपासून सुरु वात झाली. नवीन मतदार नोंदणी, दुबार मतदार, स्थलांतरित, नावात बदल अशी कामे करीत असताना संबंधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबद्दल तक्र ार असल्यास त्याविरुद्ध हरकती आणि दावे देखील करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०१७ रोजी निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याची माहिती कर्जत विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी, तथा कर्जतचे प्रांत अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली.राज्यात निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०१७ या तारखेवर आधारित १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांंचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र म हाती घेण्यात आला आहे. त्यासंबंधी माहिती मतदान नोंदणी अधिकारी दत्ता भडकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. कर्जत विधानसभा मतदार संघात ३१० मतदान केंद्रे असून त्यात कर्जत तालुक्यात १९६ आणि खालापूर तालुक्यातील ११४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्या सर्व मतदान केंद्रावर १६ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी लावण्याचे काम सुरु करण्यात आले. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत प्रारूप मतदार यादीबद्दल हरकती आणि दावे दाखल करता येणार आहेत. याच कालावधीत येणाऱ्या १८ सप्टेंबर आणि ९ आॅक्टोबर या दोन रविवारी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर पद निर्देशित अधिकारी सर्व अर्ज घेऊन उपस्थित असतील. हरकती, दावे यांच्यावर निर्णय होऊन ५ जानेवारी रोजी निवडणूक आयोग छायाचित्र मतदार यादीची अंतिम पुनर्निरीक्षण करण्यात आलेली यादी प्रसिद्ध करणार आहे. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार रमेश देशमुख, तालुका गटशिक्षण अधिकारी बी. यू. डंबाये, तालुका सहकार सहनिबंधक वैभव काळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)