शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By admin | Updated: January 28, 2017 02:53 IST

भारतीय प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या

अलिबाग : भारतीय प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ््यात रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.याप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर आदी उपस्थित होते. पोलीस पथक, दंगल नियंत्रण, महिला पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा पोलीस, होमगार्ड पथक, जा. र .ह. कन्याशाळा आरएसपी, स्काऊट गाईड, पोलीस वाद्यवृंद पथक, दामिनी, बीट मार्शल, बाँबशोध व नाश पथक, फॉरेन्सीक लॅब पथक, अलिबाग नगरपरिषद अग्निशामक दल या सर्व पथकांनी जिल्हाधिकाऱ्यांना व उपस्थितांना संचलनाव्दारे मानवंदना दिली. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक विजेते सावता महादेव शिंदे (पोलीस निरीक्षक, खोपोली ) मोहन मोरे (सायबर सेल, पोलीस अधिक्षक कार्यालय, रायगड), पांडुरंग खेडकर (पोलीस हवालदार, रोहा) यांचा ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी तेली-उगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्र, रायगडच्या वतीने रायगड जिल्हयातील सर्वोत्कृष्ट कार्य करणारे युवा मंडळ-संगीता मच्छिंद्र ठाकूर फाऊंडेशन, धुतुम, उरण या युवा मंडळाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतही गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यात विशेष प्राविण्य मिळविलेल्या सुप्रिया हंडाळ ही रायगड जिल्हयातील विद्यार्थिनी ९७.६० टक्के गुण मिळवून मुंबई मंडळातून प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाल्याने तिला एक लाख रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक, अवनी गायकवाड ही विद्यार्थिनी मुंबई शिक्षण मंडळात गुणवत्ता यादीत ९६.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिला ५० हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.सामाजिक वनीकरण विभागाच्या योजना अंतर्गत उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लावत पर्यावरणासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा प्रसाद पां. तांडेल, ऋ तुजा गोळे यांचा सन्मान करण्यात आला.