शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:22 IST

गिरीश गोरेगावकर  माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे ...

गिरीश गोरेगावकर माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे पाणीदेखील मिळणे मुश्कील झाले आहे. तसेच शौचालयही अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. याकडे येथील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. माणगाव एस.टी. स्थानकातील पाणपोईची दुरवस्था झाली असून, अनेक प्रवासी या पाणपोईचा वापर तंबाखू व पान खाऊन पिचकाºया मारण्यासाठीच करतात. गेले अनेक दिवस ही पाणपोई बंद आहे. एस.टी. महामंडळाने ही पाणपोई सुरू करावी, अशी अनेक प्रवाशांची मागणी आहे.एसटी ही ग्रामीण भागाचा आधार आहे. त्यामुळे गरीब, श्रीमंतापासून ते दुर्गम भागातील नागरिक प्रवासासाठी एसटीला पसंती देतात. उशिरा जाईन; पण एसटीनेच जाईन, अशी साधारण सर्वांची मानसिकता आहे. मात्र, प्रत्यक्षात याच एसटीची आणि बसस्थानकांची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याते मूलभूत सोयी सुविधांची वानवा असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे.माणगाव येथील एसटी स्थानकात अनेक गैरसोयी आहेत. स्थानकातील पंखे सुरू नाहीत. शौचालय व मुतारीची दुरवस्था आहे. तेथे नाकाला रुमाल बांधूनच जावे लागते. तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता न केल्याने काही जण बाहेरच लघुशंका करतात. त्यामुळे या परिसरात उग्र दर्प सातत्याने येत असतो. तसेच स्थानकाच्या छताला पाण्याची गळती सुरू असून छताचा काही भाग कोसळून उघडा पडलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात छत्री उघडून आणि जीव मुठीत धरून बसावे लागते.>पाणपोई बंदमाणगाव बसस्थानकात यापूर्वी जैन समाज, माणगाव मेडिकोज आणि बसस्थानकात पाणपोई सुरू करून प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध केले होते. कालांतराने पाच वर्षांपूर्वी यातील दोन पाणपोई बंद झाल्या.या पाणपोई देखभाल व दुरुस्ती न केल्याने या पाणपोई बंद झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले. त्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.बसस्थानकाचे नळाद्वारे पिण्यास असणारे पाणी हे शुद्धीकरण न करता प्रवाशांना मिळत होते. ते पाणी आता बंद झाल्याने त्यांना बाजारातील विक्रीस असणाºया पाण्याच्या बाटल्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.स्थानकातील पाणपोईमध्ये लोकांनी पान, तंबाखू यांच्या पिचकाºया मारून तो भाग रंगबिरंगी केले आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी येत असल्याने कोणीही जात नाही. तसेच येथे पाणपोईजवळ कचराही साठविला जात असल्याने दुर्गंधी येते. या स्थानकातील उर्वरित दोन पाणपोई सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली होती. मात्र, त्या आद्यपही सुरू झालेल्या नाहीत.>बस स्थानक हे प्रवाशांसाठी असताना या स्थानकात फेरी (फिरता व्यवसाय)चा पास काढतात. मात्र, हे व्यावसायिक स्थानकाच्या व्हरंड्यामध्ये आपला व्यवसाय टेबल वा गाडी लावून करताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांना तिथे वावरताना त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.