शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती

By admin | Updated: June 13, 2017 02:55 IST

पोलादपूरपासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मोरीचे बांधकाम करताना २००५ मध्ये ब्लास्टिंग झाल्याने संपूर्ण मोरीवरील रस्ता सातत्याने खचण्याचा प्रकार दरवर्षी

लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : पोलादपूरपासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मोरीचे बांधकाम करताना २००५ मध्ये ब्लास्टिंग झाल्याने संपूर्ण मोरीवरील रस्ता सातत्याने खचण्याचा प्रकार दरवर्षी सुरूच आहे. २०१२ मध्ये तीन वेळा मलमपट्टी तर २०१३ मध्ये पुन्हा या ठिकाणी रस्ता दुरुस्ती केल्यानंतरही प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खचत असल्याने कशेडी घाट धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यंदा महामार्ग सार्वजनिक विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीच कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग आला असून राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.भोगाव गावच्या हद्दीत कशेडी घाटातील या मोरीच्या बांधकामात ब्लास्टिंग प्रकारामुळे परिसरात लाल माती कातळापासून सैल झाल्याने आणि लाल मातीचे स्लायडिंग झाल्याने २००५ पासून येथे साधारणत: ९० ते १२५ मीटरपेक्षा जास्त लांब आणि अडीच ते तीन फूट खोल रस्ता दरवर्षी खचण्याचा प्रकार होत आहे. मात्र संबंधित खात्याकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. २०१२ मध्ये एप्रिल महिन्यात दोन दिवस मेगाब्लॉक करून रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून यंदा ही महामार्ग सार्वजनिक विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीच कशेडी घाटातील खचलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. यामुळे कशेडी घाटातील यंदाच्या पावसाळ्यातील खचलेल्या रस्त्यावरील प्रवास सुखकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून वाया घालविण्यापेक्षा येथेच रस्त्याला समांतर पूल बांधल्यास यापुढे कायमस्वरूपी उपाय होवून रस्ता खचल्याने वाया जाणारा सरकारी खर्च वाचणार आहे असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.