शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खोकरीच्या प्राचीन घुमटांची पुरातत्त्व खात्याकडून दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:50 IST

मुरुडमधील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे शिल्प इतिहासप्रेमींचे आकर्षण

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क मुरूड : येथील ऐतिहासिक स्थळांपैकी मुरुड-आगरदांडा रस्त्यावर ६ कि.मी. अंतरावर खोकरीचे गुंबज (गोल घुमट) वास्तुशास्राचा अजोड नमुना आहे. याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याकडून हाती घेण्यात आले आहे.सारसेनिक शैलीचे सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे शिल्प इतिहास प्रेमींचे आकर्षण आहे. भारतीय व अरबी पद्धतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना आहे. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियतखान व सिद्दी याकुतखान यांच्या या कबरी आहेत. दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेले हे गुंबज आहेत. त्यापैकी सर्वात मोठे गुंबज हे सिद्दी सिरूलखानचे असून सिद्दी सिरुलखान जंजिऱ्याचा १७०७ ते १७३३ प्रशासक असल्याची ऐतिहासिक नोंद आहे, तर सिद्दी याकुतखान हा १६७० ते १६७७ व १६९६ ते १७०७ या कालावधीत तो जंजिऱ्याचा नबाब होता, तर सिद्दी खैरियत खान हा याकुतखानाचा भाऊ १६७७ ते १६९६ जंजिऱ्याचा प्रशासक असल्याचा उल्लेख सापडतो. या वास्तुंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे.या ऐतिहासिक खोकरीचे गुंबज (गोल घुमट) याची दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याकडून हाती घेण्यात आले आहे. या वास्तू खूप उंच असल्याने, लोखंडी पाइपद्वारे पराची बनून या गोल घुमटाची स्वछता व दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी असंख्य कामगार तैनात करण्यात आले आहेत. हे काम खूप काळजीपूर्वक करण्यात येत आहे. या इमारतीचा कोणताही भाग कोसळू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. घुमटावर पावसाचा मारा झाल्याने काही भाग हा काळा पडला, तर वरील भागात शेवाळही पकडली आहे. यासाठी विशेष रसायनाचा वापर केला जात असून, या वास्तूची विशेष दक्षता घेतली जात आहे. स्थानिकांनी गोल घुमट काळा पडला असून, याची विशेष काळजी घेण्यात येऊन याचे दुरुस्तीचे व स्वछता करण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे, पुरातत्त्व खात्याने या गोल घुमटाकडे लक्ष दिले असून, दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. गोल घुमट वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असल्याने सदरील हे ऐतिहासिक ठिकाण बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येत असतात.

या वास्तुसंदर्भात लोकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासाठी आम्ही लोकग्रहास्तव या वास्तुबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून, केमिकल ट्रीटमेंट करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे, पुरातत्त्व खात्याच्या केमिकल शाखेकडे हे काम सुपुर्द करण्यात आले आहे. केमिकल ट्रीटमेंटमुळे या वास्तूचे आयुष्यमान वाढणार आहे.-बजरंग येलिकर, संवर्धक सहायक