शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल करप्रणालीची होणार पुनर्रचना

By admin | Updated: September 12, 2015 23:23 IST

शहरातील पायाभूत सुविधा त्याचबरोबर विकासकामांवर भर देण्यात येत असताना दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार करप्रणालीची पुनर्रचना

- वैभव गायकर, पनवेलशहरातील पायाभूत सुविधा त्याचबरोबर विकासकामांवर भर देण्यात येत असताना दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार करप्रणालीची पुनर्रचना करण्याचे काम पनवेल नगरपालिकेने हाती घेतले असून मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यानुसार सर्व माहिती अद्ययावत करण्यात येणार असून डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पनवेलमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कर वसुलीवर अधिकाधिक भर द्यावा लागत आहे. शहरात जवळपास बारा कोटींच्या आसपास महसूल जमा होत असून त्यामध्ये मालमत्ता करापासून, पाणीपट्टी, मलनि:सारण, शिक्षण, पर्यावरण अशा विविध प्रकारांतून मिळणाऱ्या करांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी कामाला लागतात. पूर्वी पालिकेत येवून कर अदा करावा लागत होता. आता महसुलात वाढ व्हावी त्याचबरोबर थकबाकी कमी होऊन जनतेची गैरसोय टाळण्याकरिता ‘ई-पेमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता पालिकेच्या वेबसाईटवर सर्व माहिती संकलित करण्यात आली असून मालमत्ताधारक ई -बँकिगच्या साह्याने कराची रक्कम अदा करता येते. महसुलाबरोबर उत्पन्नात भर टाकण्याकरिता प्रशासनाने पाऊल टाकले आहे. विशेषत: मालमत्तेचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाच्या हाती नवीन डाटा उपलब्ध होणार असून त्यानुसार कररचनेत बदल करण्यात येणार आहे. बेकायदा बांधकामांचाही सर्व्हेपनवेल शहरात कित्येक इमारती आणि सदनिकाधारकांनी अतिरिक्त बांधकाम केले आहे. त्याचबरोबर अंतर्गत बदल केले असून त्यामध्ये बाल्कनी, प्लॉवर बेड आदी गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर काही इमारतीत नव्याने बांधकाम करून क्षेत्रफळ वाढवले आहे. त्याबाबत पालिका दरबारी नोंद नाही. या सर्वेक्षणात जास्तीच्या बांधकामाची माहिती प्राप्त होणार आहे. त्यानुसार संबंधिताच्या करात वाढ करता येणे शक्य होणार आहे.