शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ २३६० रुपयांत, जिल्ह्यातील औषध दुकांनामध्ये उपलब्ब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:54 IST

या औषधाचे यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम होतात. त्याचप्रमाणे, टोसीलीजुमाब औषधाचाही मृत्युदर कमी करण्यात उपयोग होत नाही.

निखिल म्हात्रेअलिबाग  :  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. अतिगंभीर लागण झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर औषध दिले जात होते. या औषधाचे बाजारीकरण होऊन किमतीपेक्षा जास्त प्रमाणात विकले जात होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी निर्बंध घालून सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत विक्री करण्याचे आदेश दिले होते.या औषधाचे यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम होतात. त्याचप्रमाणे, टोसीलीजुमाब औषधाचाही मृत्युदर कमी करण्यात उपयोग होत नाही. या औषधांचा परिणाम गंभीर म्हणजे, ‘सायकोटाइन स्टोर्म’ स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याचा योग्य तेवढाच वापर हवा. या सर्व ‘संशोधनात्मक उपचारपद्धती’ योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी, जिथे रुग्णांवर योग्य लक्ष ठेवणे शक्य असेल, तिथेच करून बघायला हव्यात, जेणेकरून त्यांचे काही विपरीत परिणाम झाल्यास, त्यावर त्वरित उपचार करता येतील. 

कोरोनाचे एकूण रुग्ण - 52555बरे झालेले - 49113उपचार चालू  - 1941बळी - 1501

जिल्ह्यात दररोज साधारण - 80 इंजेक्शन खुल्या बाजारात इंजेक्शन दर - 2360

खाजगी रुग्णालयातील रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर हे औषध सरकारने ठरवून दिलेल्या दरातच विकले गेले पाहिजे. 

लाभदायक नाही रेमडेसिवीरच्या उपलब्ध दाव्यानुसार, हे औषध जर मध्यम किंवा तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले गेले, तर त्यांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये लवकर सुधारणा होऊ शकते. मात्र, कोविड मृत्युदर कमी करण्यात ते लाभदायक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 

दोषींविरोधात कारवाई  करण्यात येईल जिल्हाभरातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिवीर हे औषध पूर्णपणे मोफत केले आहे. तरी कुठल्या रुग्णाला बाहेरून रेमडेसिवीर विकत आणायला सांगितल्यास त्याची चौकशी करून त्या दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल. खाजगी रुग्णालयातील रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर हे औषध सरकारने ठरवून दिलेल्या दरातच विकले गेले पाहिजे. कोणी वाढीव दराने विकत असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी

गरज असेल तरच औषधरेमडेसिवीर औषधाची जिथे गरज नसेल, तिथे वापर केल्याने त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच रुग्णाला रेमडेसिवीर हे औषध दिले जात आहे.                  - डॉ. राजू तंबाळे

आयसीएमआरच्या शिफारसीनुसार, वैद्यकीय व्यवस्थापनाचा भर, ऑक्सिजन थेरेपी (यात नाकाद्वारे ऑक्सिजन देणे), स्टेरॉइड, टीकोएँग्यूलंट आणि इतर पूरक उपचारांचा योग्य प्रमाणात वापर, त्यासोबतच रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना मानसिक समुपदेशन, आधी असलेल्या आजारांवर उपचार या सर्व बाबींवर भर दिला जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयmedicineऔषधं