शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा बँकेच्या प्रलंबित विमा लाभार्थी ठेवीदारांना दिलासा; 237 ठेवीदारांना मिळणार 67 लाख 

By वैभव गायकर | Updated: May 22, 2024 19:01 IST

पाच लाखापर्यंतच्या 237 ठेवीदारांचे 67 लाख रुपये अडकले आहेत.

पनवेल : कर्नाळा बँकेच्या प्रलंबित विमा ठेवीदारांना येत्या सोमवारपासून दि.27 रोजी पासुन परतावा मिळण्यास पुन्हा प्रारंभ होत आहे. पाच लाखापर्यंतच्या 237 ठेवीदारांचे 67 लाख रुपये अडकले आहेत. तो मार्ग पनवेल संघर्ष समितीने मोकळा केला आहे. हे पैसे बँक ऑफ बडोदाच्या ताडदेव शाखेत पडून आहेत. साडेपाचशे कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या कर्नाळा बँकेचे ठेवीदार परताव्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याकडे डोळे लावून बसले आहेत. शेकडो ठेवीदारांना बुडीत बँकेतील पैसे परत मिळवून देण्याचा कडू यांनी अल्पवधीत महाराष्ट्रात इतिहास रचल्याने पन्नास हजार ठेवीदारांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. त्यातील 237 ठेवीदार परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

काही तांत्रिक कारणे आणि नामसाधर्म्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीचा सामना त्यांना गेल्या दोन वर्षात करावा लागला आहे. मधल्या काळात बँक ऑफ बडोदाच्या, ताडदेव शाखेतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांमुळे कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना पैसे मिळण्यात अडसर निर्माण झाला आहे. यासंदर्भात कांतीलाल कडू यांनी बडोदा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले होते. तसेच रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता.

याशिवाय कर्नाळा बँकेचे अवसायक बालाजी कटकधोंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण म्हात्रे यांच्याकडे पाठपुरावा सातत्याने सुरु होता. कटकधोंड आणि म्हात्रे यांनी बडोदा बँकेत जावून चौकशी केली. कडू यांनी दिलेल्या पत्राची आठवण करून देत तेसुद्धा त्यांच्यासमोर ठेवले. तेव्हा बडोदा बँकेतील कर्मचार्‍यांच्या बदलीमुळे हे प्रस्ताव रखडलेले असल्याचे सांगत येत्या सोमवारपासून पुढच्या 15 दिवसात ही प्रकरणे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल