शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२००३ ची बांधकामे नियमित करा, सुभाष देसाई यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:20 IST

माथेरान आणि परिसराला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आल्यानंतर २००३ नंतर झालेली बांधकामे माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने अनधिकृत ठरविली आहेत.

अजय कदम माथेरान : माथेरान आणि परिसराला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आल्यानंतर २००३ नंतर झालेली बांधकामे माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने अनधिकृत ठरविली आहेत. अशी ५०० बांधकामांची यादी नगरपालिकेने पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केली आहेत. माथेरान नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी २०१५ पर्यंतची सर्व बांधकामे शासनाच्या नियमाप्रमाणे नियमित करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लावून धरली आहे.माथेरान या वन जमिनीवर वसलेल्या शहरात १९८९ नंतर स्थानिकांना भूखंड वाढवून देण्यात आले नाहीत.निसर्ग नियमाप्रमाणे कुटुंबाचा वाढलेला पसारा आणि त्यांच्यासाठी जागेची गरज भागविण्याची राज्य सरकारची जबाबदारी होती. परंतु तसे न होता २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आले. त्यावेळी नवीन विकास आराखडा तयार होत नाही तोपर्यंत माथेरानमध्ये नवीन बांधकामांना परवानगी न देण्याच्या केंद्रीय पर्यावरण विभागाच्या सूचना होत्या. २००३नंतर पुढील दोन वर्षांनी विकास आराखडा मंजूर होणार होता, परंतु आजपर्यंत विकास आराखडा मंजूर झाला नाही. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे माथेरानमध्ये बांधकामे झाली, त्यांना नगरपालिकेने कर देखील आकारला. आता नगरपालिकेने त्या ५०० हून अधिक बांधकामांना अनधिकृत ठरवले आहे. त्यात राष्ट्रीय हरित लवादाने टप्प्याटप्प्याने सर्व बांधकामे तोडण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे आज माथेरान उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत हरित लवादामध्ये माथेरान नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बांधकामांची यादी पुढे करून स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकारी वर्गाने अनधिकृत बांधकामे त्या त्या वेळी रोखली असती तर आज माथेरानमधील राहिवाशांवर टांगती तलवार आली नसती.

टॅग्स :Raigadरायगड