शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू

By निखिल म्हात्रे | Updated: May 31, 2024 14:05 IST

कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती.

अलिबाग - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात 45 हजार 338 इतकी पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात पुरुष मतदार 25 हजार 724, महिला मतदार 19 हजार 697 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 7 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून त्यांची संख्या 15 हजार 675 इतकी आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने कोकण पदवीधर संघासाठी मतदार नोंदणी पुन्हा सुरू झाली आहे.

कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलैला संपत आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. 8 मे रोजी निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच या चार विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते.  येत्या 10 जून रोजी मतदान तर 13 जूनला मतमोजणी होणार होती.

मात्र राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट‌या सुरू असून शाळा 10 ते 15 जूनच्या दरम्यान भरणार आहेत. अनेक शिक्षक मतदार उन्हाळी सुट्टीसाठी आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राजकीय पक्ष तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक पुढे गेल्याने आता या मतदारसंघांतील मतदारनोंदणी आता पुन्हा सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी मोठा प्रतिसाद दिला आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पदवीधर मतदान नोंदणीसाठी विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्हयात एकूण 36 मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र आणि मतदार हे पनवेल तालुक्यात आहेत. 1 जानेवारी 2024 पर्यंत पनवेल तालुक्यातील 9 मतदान केंद्रांसाठी 15 हजार 675, उरण तालुक्यातील दोन मतदान केंद्रांसाठी 3 हजार 582, कर्जत तालुक्यातील तीन मतदान केंद्रांसाठी 2 हजार 890, खालापूर तालुक्यातील दोन मतदान केंद्रांसाठी 2 हजार 386, पेण तालुक्यातील तीन मतदान केंद्रासाठी 4 हजार 807, अलिबाग तालुक्यातील 4 मतदान केंद्रांसाठी 3 हजार 695, सुधागड तालुक्यातील एक मतदान केंद्रासाठी 1 हजार 84, रोहा तालुक्यातील दोन मतदान केंद्रासाठी 3 हजार 457, मुरुड तालुक्यातील एक केंद्रासाठी 937, तळा तालुक्यातील एक केंद्रासाठी 291, माणगाव तालुक्यातील दोन केंद्रांसाठी 1 हजार 884, म्हसळा तालुक्यातील एक केंद्रासाठी 566, श्रीवर्धन तालुक्यातील दोन मतदान केंद्रांसाठी 621, महाड तालुक्यातील 2 मतदान केंद्रांसाठी 2 हजार 931, पोलादपूर तालुक्यातील एक मतदान केंद्रासाठी 622 अशा एकूण 45 हजार 288 मदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुष मतदार 25 हजार 724, महिला मतदार 19 हजार 697 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 7 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून त्यांची संख्या 15 हजार 675 इतकी आहे.रायगडमधील मतदार नोंदणी1) पनवेल - 156752) उरण - 35823) कर्जत - 28904) खालापूर - 23865) पेण - 48076) अलिबाग - 36057) सुधागड - 10848) रोहा - 34579) मुरुड - 93710) तळा - 29111) माणगाव - 188412) म्हसळा - 56613) श्रीवर्धन - 62114) महाड - 293115) पोलादपूर - 622 

टॅग्स :alibaugअलिबागElectionनिवडणूक 2024