शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेडचे काम सुरू

By admin | Updated: January 5, 2016 02:01 IST

रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या आदेशानुसार पनवेल तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलरायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या आदेशानुसार पनवेल तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सगळ्या रूममधील कागदपत्रांची छाननी सुरू असून, सहा ट्रक कागद निकाली काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा डेटा संगणकावर फिड करण्यात येणार आहे. लवकरच रेकॉर्ड रूम कागदांच्या गठ्ठ्यातून मुक्त होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पनवेल तहसील अतिशय जुने असून, ब्रिटिशकालीन बिल्डिंगमध्ये कारभार मागील एक-दीड वर्षापर्यंत सुरू होता. या जागेवर प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू असल्याने तहसील कार्यालय महसूल प्रबोधिनीत हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणीसुद्धा एक रेकॉर्ड रूम तयार करण्यात आली आहे. १८३९ पासूनचे रेकॉर्ड या रूममध्ये स्टोअर करण्यात आले होते. मोठमोठ्या गाठ्ठ्यांनी ही रूम व्यापली होती. आग लागणे, त्याचबरोबर इतर दुर्घटना येथे घडण्याची शक्यतासुध्दा व्यक्त होत होती. दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड रूममधील कागदाचे गठ्ठे अंगावर पडून आरटीओ कार्यालयात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. माहिती आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर डिजिटलच्या जमान्यात गठ्ठे पद्धत खटकणारी असल्याने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसील कार्यालयाचे रेकॉर्ड रूम अपडेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार दीपक आकडे, नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांनी अभिलेख वर्गीकरण प्रतिष्ठानच्या मदतीने रेकॉर्ड रूममधील कागदपत्रांची छाननी सुरू आहे. त्यामध्ये एकूण सहा ट्रक कागदपत्रं निरुपयोगी असल्याने आढळून आले. हे सगळे कागद रिसायकलिंगकरिता पेपर मिलमध्ये पाठविण्यात आले असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे पुन्हा व्यवस्थित फायलिंग करून ठेवण्यात आले आहे. बहुतांशी माहिती संगणकीकृत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.