शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाभरे धरण दुरुस्तीचे काम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:20 IST

तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणाऱ्या पाभरे या धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ७६ लाख ६५ हजारांचा निधी मंजूर झाला

म्हसळा : तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणाऱ्या पाभरे या धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ७६ लाख ६५ हजारांचा निधी मंजूर झाला असून या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम संथ गतीचे सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. या संदर्भात कनिष्ठ अभियंता एस.एच. चितळकर म्हणाले की, हे काम आम्हाला १२ जूनपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु संबंधित ठेकेदार व त्याठिकाणी असलेले अल्प कर्मचारी, कामगार यामुळे ज्या गतीने काम होणे अपेक्षित आहे ते होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या कामाचा उद्देश मुख्य धरणातील मुख्य पाइपलाइन यांची दुरुस्ती करावयाचे आहे. परंतु जर का हे काम पाऊस पडण्यापूर्वी झाले नाही तर पुन्हा एकदा ७६ लाख ६५ हजार पाण्यातच जातील अशी भीती टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना वाटत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास पुन्हा १०गावे आणि चार वाड्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे. आता सुरु असलेले काम हे दर्जेदार होण्यासाठी स्थानिक प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी तसेच विभागाचे ग्रामस्थ यांनी विशेष लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लघुपाटबंधारे विभाग कोलाडअंतर्गत पाभरे धरणाची रखवाली करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु ते कर्मचारी धरणाकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कामगार धरणाच्या पाण्यात जे पाणी पिण्यासाठी सोडण्यात येते तेथे आंघोळ करतात, मात्र याकडे संबंधित लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थ शांताराम चव्हाण यांनी सांगितले. या धरणाच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.>पाभरे धरणात माझ्यासमोर काम करणारे कर्मचारी कामगार चक्क आंघोळ करत होते. लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता चितळकर यांच्या समोर काम करणारे कामगार पिण्याच्या पाण्याच्या धरणात आंघोळ करत होते, परंतु त्यांना कोणीही काहीही बोलत नव्हते.- शांताराम चव्हाण, ग्रामस्थ, विठ्ठलवाडीलघुपाटबंधारेचे कनिष्ठ अभियंता चितळकर यांना ही बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांना विचारले असता कामगार आंघोळ करत असल्याचे मी पाहिले, मी त्यांना याबाबत तंबी दिली असून पुन्हा असे होणार नाही असे कामगारांनी सांगितले आहे.