शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

 आदरातिथ्याने सकल मराठा भारावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 06:29 IST

मराठा क्रांती मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांनी आदरातिथ्याची भूमिका बजावली. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांची २० हजार वाहने उभी करण्यासाठी विशेष वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांनी आदरातिथ्याची भूमिका बजावली. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांची २० हजार वाहने उभी करण्यासाठी विशेष वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनासाठी आलेल्या हजारो नागरिकांना चहा, नाष्टा, जेवण, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून दिले होते. नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने सकल मराठा जनही भारावून गेले होते.मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होण्यामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांची भूमिका महत्त्वाची ठरली. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद परिसरातून लाखो मराठा नागरिक आंदोलनासाठी मुंबईमध्ये धडकणार होते. सर्वच वाहने मुंबईमध्ये गेली तर प्रचंड वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. मुंबईमधील वाहतूक यंत्रणा कोलमडून त्याचा परिणाम जनजीवनावर व प्रत्यक्ष मोर्चावरही होण्याची शक्यता होती. यामुळे पोलीस प्रशासनाने कमीत कमी वाहने मुंबईमध्ये जावी यासाठी मोर्चाचे नियोजन करणाºया पदाधिकाºयांना आवाहन केले. मोर्चेकºयांनी त्यांनी वाहने खारघरमधील सेंट्रल पार्क, सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, एपीएमसीचे मसाला व कांदा - बटाटा मार्केट व वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभी करता यावी यासाठी विशेष वाहनतळांची व्यवस्था केली होती. प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांची वाहने कुठे उभी करायची याविषयीचेही नियोजन करण्यात आले. तब्बल २० हजार वाहने या वाहनतळांवर उभी करण्यात आली. सर्व नागरिकांनी हार्बर रेल्वेने मोर्चाच्या ठिकाणी जाण्यास पसंती दिली. याशिवाय शहरामधील नागरिकांनीही रेल्वे मार्गेच आझाद मैदानावर जाण्यास पसंती केली. दहा हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार सानपाड्यावरून मोर्चाच्या ठिकाणी रवाना झाले. बीडमधून आलेल्या नागरिकांची सोय सानपाडा दत्तमंदिर परिसर, सातारा व कोल्हापूरमधून आलेल्या नागरिकांसाठी माथाडी भवन व एपीएमसीमध्ये सोय करण्यात आली.वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोननवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी खारघर टोल नाका परिसरात ड्रोनचा उपयोग केला होता. या कॅमेºयाद्वारे नवी मुंबई आयुक्तालयात वाहतुकीच्या परिस्थितीची माहिती दिली जात होती.६०० डॉक्टरांची टीमनवी मुंबईमध्ये ६०० डॉक्टर व शेकडो स्वयंसेवकांची टीम वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कार्यरत होती. वाहनांची पार्किंग, चालकांना सूचना, वैद्यकीय सुविधा, मोर्चेकºयांना नाष्टा, पाणी पुरविण्याचे काम हे स्वयंसेवक सकाळपासून करीत होते.आंदोलकांची शिस्तबद्धतामराठा क्रांती मूक मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांनी कुठेही गोंधळ होणार नाही, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात होती. मोर्चासाठी निघताना ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणा दिल्यानंतर रेल्वेने प्रवास करताना व इतर ठिकाणी कोणत्याही घोषणा दिल्या जात नव्हत्या. माथाडी कामगारांनीही कांदा - बटाटा मार्केट ते सानपाडा स्टेशनपर्यंत घोषणा दिल्या, परंतु नंतर शांततेने मुंबईकडे मार्गक्रमण केले.दोन दिवस राबले स्वयंसेवकनवी मुंबईमध्ये आलेल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवक दोन दिवस दिवस-रात्र परिश्रम घेत होते. वाहनतळाची जागा साफ करण्यापासून ते अल्पोपहार व जेवणासाठीच्या डीश, पत्रावळ्या उचलण्यापर्यंत सर्व कामे स्वयंसेवक स्वेच्छेने करत होते. वाहनांची किरकोळ दुरुस्तीसाठी मेकॅनिकचे पथकही तैनात करण्यात आले होते. रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टर, मोफत औषधोपचाराचीही व्यवस्था करण्यात आली.एपीएमसीमध्ये विशेष सुविधाआंदोलनासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी वगळता इतर सर्व मार्केट पूर्णपणे बंद होती. कांदा बटाटा व मसाला मार्केटमध्ये वाहने उभी करण्याची व चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली होती. मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी तब्बल दहा हजार नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. व्यापारी व माथाडी कामगारांनी परिश्रम घेतले.वाशी टोलनाक्यावर वाहनांचे सुयोग्य नियोजनमराठा क्रांती मोर्चासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या मोर्चेकºयांच्या वाहनांच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी नवी मुंबईवर आली होती. त्यानुसार रस्ते वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही किंबहुना वाहतूककोंडीची समस्या उद्भवणार नाही, या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी पुरेपूर नियोजन केले होते. विशेषत: मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया वाशी टोलनाक्यावर वाहनांची रखडपट्टी होणार नाही, या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती. त्यासाठी मुंबईकडे जाणाºया सर्वच वाहनांना जवळपास साडेतीन तास टोलमुक्त प्रवेश देण्यात आला. त्यामुळे टोलनाक्यावर कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी झाली नाही. वाहतूक विभागाच्या वाशी शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड हे आपल्या टीमसह स्वत: सकाळपासून टोलनाक्यावर तळ ठोकून होते. तर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी टोलनाक्याला भेट देवून वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.मदत कक्षरेल्वे स्थानकाबाहेर मदत कक्ष उभारून या माध्यमातून परगावाहून आलेल्या बांधवांना पुढील प्रवासासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मदत कक्षात पाच ते सहा स्वयंसेवक कार्यरत होते. मदत कक्षांमध्येही प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली होती. मोर्चात सहभागी होणाºया नागरिकांना फळे, चहा-बिस्कीट आणि नाश्त्याचे वाटप करण्यात आले. या वेळी निर्माण होणारा कचरा त्वरित उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.शिवसैनिकांचाही मदतीचा हातनवी मुंबई शिवसेनेच्यावतीने सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये वाहने उभी करणाºया आंदोलनकर्त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारली होती. वाहने शिस्तबद्धपणे उभी करण्याबरोबर आंदोलनकर्त्यांना चहा, नाष्टा उपलब्ध करून देण्यात आला. मनपातील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाºयांनी दोन दिवस मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. विजय माने, रंगनाथ औटी, काशिनाथ पवार व इतर पदाधिकाºयांनी विशेष परिश्रम घेतले. सानपाडा येथील वºहाड भवनसह इतर ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या निवासाची सोय शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.तरु णांचा उत्साह शिगेलामोर्चासाठी तरु ण मोठ्या प्रमाणात एकवटले होते. आरक्षण मिळालेच पाहिजे, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देऊन मुंबईकडे रेल्वेतून रवाना झाले.पारंपरिक संस्कृतीचे दर्शनमोर्चात सहभागी होणाºया अनेक मोर्चेकºयांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती. यामध्ये मावळ्यांची वेशभूषा धारण करणारे तरु ण मोठ्या संख्येने पाहावयास मिळाले.मुंबईकडे जाणाºया सीएसएमटी रेल्वेमध्ये मराठा बांधवांची अलोट गर्दी होती. शिवकालीन मावळ्यांची वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा तसेच भगवे झेंडे हातात फडकवून हजारो तरु ण मोर्चात सहभागी झाले होते. कामोठेमध्ये कराडी समाज हॉल, सद्गुरू वामनराव पै नामस्मरण केंद्रात मोर्चेकºयांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मराठा समाजावर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. विशेष करून शिक्षणाच्या बाबतीत इच्छा असून समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मराठा समाजाला आज खरोखरच आरक्षणाची गरज असून त्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने एकत्र आलो आहोत. ते न मिळाल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभे राहील.- रामचंद्र माने, पुणेकोपर्डीसारखी घटना वारंवार घडू नये, याकरिता आरोपींना लवकरात लवकर फाशी देणे गरजेचे आहे. आजच्या नवीन पिढीला आरक्षणामुळेच शिक्षणात मागे राहावे लागले आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक निकषावर तरी आरक्षण देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास गरजू सर्वसामान्य भरडला जाणार आहे.- डॉ. प्रमोद आमृले, मोर्चात सहभागी झालेला उच्चशिक्षित तरु णमोर्चेकºयांना नाष्टा-पाण्याची व्यवस्थाखारघर, मानसरोवर, खांदेश्वर या रेल्वे स्थानकाबाहेर मोर्चासाठी मुंबईकडे वाटचाल करणाºया हजारो मराठा बांधवांना मोफत नाष्टा-पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर स्थापन केलेल्या मदत कक्षाद्वारे यावेळी मोर्चेकºयांना आवश्यक सूचना देण्यात येत होत्या.मोबाइल टॉयलेटची व्यवस्थामोर्चेकºयांच्या व्यवस्थेसाठी पार्किंगच्या ठिकाणी व शहरातील महत्त्वाच्या भागात मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. ३0 ते ४0 मोबाइल टॉयलेट यावेळी शहरातील विविध भागात ठेवण्यात आले होते.पोलिसांच्या नोंदणीनुसार पाच हजारांपेक्षा अधिक वाहने खारघरच्या टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने व खाजगी बसचा समावेश होता. अतिशय नियोजनबद्ध मोर्चामुळे कोठेही वाहतूककोंडीची समस्या उद्भवली नाही.