शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीअभावी विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 23:31 IST

सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वाढणारी लोकसंख्या व शिक्षणासाठी बाहेर पडणारे मुले व मुली यांच्या

पाली : सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वाढणारी लोकसंख्या व शिक्षणासाठी बाहेर पडणारे मुले व मुली यांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली असताना गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बसेसच्या फेऱ्यांची संख्या मात्र स्थिर आहे. एकीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणवून घेणाऱ्या महामंडळाला सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्येच्या प्रमाणात किती एसटी बसेस असाव्यात याचे गणित सोडविता आले नाही.जून महिन्यात शाळा सुरू होते तेव्हा विद्यार्थ्यांच्या पुढे पासाची पहिली समस्या उभी राहते. पाली वाहतूक नियंत्रकाने गाड्यांचे वेळापत्रक व टिपणी हे काम करायचे आणि पासेसचेही काम करायचे. पाली येथे जवळपास तीन साडेतीन हजार पासेसची संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पासेसला सर्व नोंदी करण्यासाठी तीन ते चार मिनिटे वेळ लागतो. अशावेळी विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा बुडवून स्टँडवर उभे राहावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी महामंडळाकडून अतिरिक्त कर्मचारी दिला जात नाही. अशी स्थिती स्वत: महामंडळाने करुन घेऊन वेळकाढूपणा करण्याचे चित्र दिसत आहे. पाली ते नांदगाव, पाली ते नागोठणे आणि पाली ते खोपोली या तिन्ही मार्गांवर सकाळच्या वेळेत येणाऱ्या दोनच बसेस आहेत. या एसटीमधून प्रवास करणारे प्रवासी व विद्यार्थी यांची संख्या ही १०० ते १२० पर्यंत असते. जांभूळपाडा, परळी, पेडलीकरिता तसेच शिहू, बेणसे, नागोठणे या मार्गांवर बसेसची संख्या वाढवावी व महाविद्यालयाच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळा लक्षात घेऊन ही सेवा विद्यार्थ्यांसाठी पुरवावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता सहकार्य करावे, अशी विनंती वजा मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)