शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरसीएफ स्फोट प्रकरण; जखमी साजिदचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 4 वर

By राजेश भोस्तेकर | Updated: October 20, 2022 17:52 IST

आरसीएफमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्च स्तरीय तज्ञ सदस्याची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समिती मार्फत दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे.

अलिबाग - अलिबाग तालुक्यातील थळ येथील खत निर्मित आरसीएफ कंपनीत जीटीजी या विभागात एसी रुमच्या कॉम्प्रेसर चे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन तीन कर्मचारी मयत झाले असून तीन जण स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाले असल्याची घटना बुधवारी १९ ऑक्टोंबर रोजी घडली होती. साहिद मोहम्मद सिद्दीकी २३ वर्ष,  जितेंद्र शेळके, वय ३४, अतींदर मनोज हे तिघे जखमी झाले होते. याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. यापैकी साहिद मोहम्मद सिद्दीकी याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत आरसीएफ प्रशासनाकडून उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी केली जाणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. 

आरसीएफ कंपनीत मेसर्स ए ग्लोबल या ठेकेदार कंपनी मार्फत बाष्प निर्मित सयत्रासाठी नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम जीटीजी विभागात सुरू होते. ठेकेदार कंपनीचे पाच तर एक मॅनेजमेंट कर्मचारी असे सहा जण सकाळ पासून काम करीत होते. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यामध्ये अंकित शर्मा (२७), फैजून जुनेद शेख (३२), दिलशाद आस्लाम इदनिकी (२९) हे मयत झाले. साहिद मोहम्मद सिद्दीकी, जितेंद्र शेळके, अतींदर मनोज  हे तिघे जखमी झाले होते. जखमींना तातडीने आर सी एफ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते.

साहिद मोहम्मद सिद्दीकी याच्यावर ऐरोली फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार दरम्यान साहिद हे मृत झाले आहेत. आर सी एफ प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबास प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या उपचाराचा खर्च आणि प्रत्येकी तीन लाख रुपये तातडीची मदत सपूर्दा करण्यात आलेली आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांनी अकस्मात अपघात मृत्यू ची नोंद केलेली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. 

दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी

आरसीएफमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्च स्तरीय तज्ञ सदस्याची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समिती मार्फत दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे. मुख्य महा व्यवस्थापक (कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचे श्रीनिवास कुळकर्णी मुख्य महाव्यवस्थापक, प्रशासन व मानव संपदा यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे. 

टॅग्स :alibaugअलिबाग